
माजी खासदार नवनीत राणा या नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. त्या जरी सध्या खासदार नसल्या तरी त्यांच्या मागचे वलय मात्र कायम आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. त्यामुळे त्या अमरावतीतल्या वेगवेगळ्या मंडळांना भेट देत आहेत. तिथे त्यांचे स्वागतही होत आहे. त्याच बरोबर त्यांना गरबा खेळण्याचा आग्रही होत आहे. कार्यकर्त्यांनी केलेला आग्रह त्यांना टाळता ही येत नाही. त्यामुळे डिस्को दांडीया खेळताना त्या दिसत आहेत. असाच त्यांचा एक दांडीया खेळतानाचा भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अमरावतीमध्ये परंपरा ग्रुपने अंबा गरबा महाकुंभ रासगरबा नवरात्री उत्सवाचं आयोजन केलं आहे. यासाठी अमरावती महापालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा आले होते. त्याच वेळी माजी खासदार नवनीत राणा याही उपस्थित होत्या. त्यावेळी देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर दांडीयाला सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप महिला कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांना दांडीया खेळण्याचा आग्रह केला. यावेळी मोठ्या संख्येने भावीक तिथे दांडीया खेळत होते.
त्याच वेळी झालेला आग्रह नवनीत राणा या टाळू शकल्या नाहीत. त्या त्यांच्या विंदास अंदाजात दांडीया खेळू लागल्या. तुझे देख के दिल मेरा धडका या गाण्यावर त्यांनी अफलातून डिस्को दांडीया केला. त्यावेळी त्यांना त्यांच्या महिला कार्यकर्त्यांचीही साथ मिळाली. अनेकांनी त्यावेळचा व्हिडीओ शुट केला. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नवनीत राणा या एकएक डान्सच्या स्टेप करत होत्या. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्या फॉलो करत होत्या.
नक्की वाचा - Garba Rada: गरबा खेळताना जोरदार राडा! हाणामारी, दगडफेकीनं रात्र गाजली, 63 जणांवर गुन्हे
गरबा खेळतानाचा हा व्हिडीओ नवनीत राणा यांनीही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर अनेक समिश्र प्रतिक्रीया आल्या आहेत. सर्वात मिसळणाऱ्या लिडर अशी ही प्रतिक्रीया आली आहे. तर बॉलिवूडच्या गाण्यांवर गरबा करणं किती योग्य आहे अशी ही विचारणार काही जणांनी कमेंटमध्ये केली आहे. तर काही जण पुरग्रस्तांना मदत करा अशी मागणी कमेंटच्या माध्यमातून करत आहेत. काही जणांनी नवनीत राणा यांचे कौतूक केले आहे. तुम्ही मराठी विदर्भात एकरूप झालात अशी ही कमेंट केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world