दिवाळीत फटाके आणि दिव्यांमुळे घडणारे अपघात होणार कमी!

अदाणी फाऊंडेशन आणि अदाणी इलेक्ट्रिसिटी तर्फे सुरू असलेल्या उत्थान या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत सुरक्षेचा संदेश मुंबई महापालिकेच्या शाळांमधून देण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

दिवाळी हा प्रकाशाचा सण. या सणामुळे आजूबाजूचा अंधार दूर होतो आणि  तेजोमय वातावरण निर्माण होते.  या काळात लहान मुले फटाके उडवून या सणाचा आनंद लुटतात. त्यावेळी दुर्दैवाने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडतात. या अपघातामध्ये लहान मुलं जखमी होतात. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात देखील कधी-कधी आग लागण्याच्या घटना घडतात. या घटना घडू नये यासाठी अदाणी फाऊंडेशन आणि अदाणी इलेक्ट्रिसिटी तर्फे सुरू असलेल्या उत्थान या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत सुरक्षेचा संदेश मुंबई महापालिकेच्या शाळांमधून देण्यात येत आहे. यामुळे केवळ पालिकेच्या शाळेतील विद्यार्थीच नव्हे तर मुंबईतील 38 हजार घरांमध्ये सुरक्षेचा संदेश पोहचण्यावर भर देण्यात आला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे मोहिमेचा उद्देश?

 सुरक्षाविषयक जागरुकतेला प्रोत्साहन देणे -  मुलांना तसेच विविध समाजघटकांना, दिवाळीत आगीपासून सुरक्षितता आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठीचे संकेत, याबाबत प्रशिक्षण दिले जाईल.
 समाजाभिमुख वृत्ती वाढवणे - दिवाळीतले दिवे, पणत्या यांचे वाटप करून दुसऱ्याला काहीतरी देण्याची तसेच चांगुलपणाच्या वृत्तीला प्रोत्साहन देणे आणि कंदील बनवण्यासारख्या कलाकृतींना प्रोत्साहन देणे.
 महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे - दिवाळीचे दिवे बनवण्याच्या उपक्रमामध्ये समाजाच्या निम्नस्तरातील महिलांना समाविष्ट करून त्यांना उत्पन्न मिळवण्याच्या संधी देणे.
 विद्यार्थ्यांबरोबर सहभाग - जागरूकता मोहिमा आणि रचनात्मक कृतीमध्ये शाळांना सहभागी करून घेणे तसेच सुरक्षा संदेश समाजात सर्वत्र पोहोचवण्यासाठी त्यांचा सहभाग वाढवणे.
 समाजाचा सहभाग - सुरक्षाविषयक जागृतीची मोहीम झोपडपट्ट्या तसेच हे विद्यार्थी जेथे राहतात त्या वसाहतींमध्ये चालवणे.

या मोहिमेचे महत्त्वाचे भाग

 जागरूकता सत्रे. अग्नीसुरक्षा आणि आरोग्य प्रशिक्षण - अग्नीसुरक्षा अधिकारी तसेच सहाय्यक हे शाळांमध्ये यासंदर्भातील प्रात्यक्षिके दाखवतील. या प्रात्यक्षिकांमध्ये अग्नीसुरक्षा विषयक प्रत्यक्ष नियम तसेच आरोग्य जपण्याचे सल्ले आणि विद्यार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याबाबत माहिती दिली जाईल.

 कंदील तयार करण्याच्या कार्यशाळा. कलाकारांच्या कलागुणांना वाव - अदाणी इलेक्ट्रिसिटीचे सहाय्यक हे कंदील तयार करण्याच्या कार्यशाळा वेगवेगळ्या शाळांमध्ये आयोजित करतील. याद्वारे विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन देऊन दिवाळीसाठी कंदील बनवून त्यांना देणे हा यामागील हेतू आहे.
 दिव्यांचे वाटप. समाजात चांगुलपणाच्या भावनेला प्रोत्साहन देणे -  या मोहिमेत पी उत्तर आणि एम पश्चिम प्रभागात 19 हजार विद्यार्थ्यांना दीड लाख दिवे, पणत्या यांचे वाटप केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला पाच दिवे, पणत्या मिळतील. त्यातील चार पणत्या ते शेजाऱ्यांना देतील. त्याद्वारे समाजात काहीतरी चांगले काम केल्याचा संदेश जाईल, तसेच सुरक्षिततेचा संदेशही सर्व समाजात दिला जाईल.

धारावी मधील महिलांचे सक्षमीकरण. महिलांसाठी उत्पन्न मिळवून देणे - या मोहिमेद्वारे समाजाच्या निम्नस्तरातील, धारावीतील महिलांना दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना सणासुदीच्या दिवसात उत्पन्न मिळवण्याची संधी दिली जाईल. त्याद्वारे या महिलांचे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून तसेच पर्यावरणाची जपणूक करून या महिलांचा स्तर उंचावण्याचे ध्येय आहे.
 समाज सुधारणा मोहीम. झोपड्यांमध्ये सुरक्षितता मोहीम - ही शाळकरी मुले तसेच त्यांचे कुटुंबीय जिथे राहतात अशा वसाहतींमध्ये जागरूकता मोहीम आयोजित केली जाईल. त्यात आधीपासून सुरक्षितता आणि जबाबदारीने दिवाळी साजरी करण्याबाबत माहिती दिली जाईल. याद्वारे सर्वांची सुरक्षितता आणि आनंद यासाठी सामूहिक जबाबदारीचे भान सर्वांना येईल.

काय होणार परिणाम?

या मोहिमेच्या माध्यमातून खालील परिणाम होण्याची शक्यता आहे. 

सुरक्षाविषयक जागरूकता वाढेल- शैक्षणिक मोहिमा राबवल्याने विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय दिवाळीदरम्यान सुरक्षितपणे वागतील व त्यामुळे अपघात कमी होतील.

सामाजिक बंध दृढ होतील - दिव्यांचे वाटप तसेच सामाजिक आनंदावर भर देणारे उपक्रम राबविल्याने समाजात समाधानाची आणि एकजुटी भावना वाढीस लागेल.

महिला सक्षमीकरण - समाजाच्या निम्नस्तरातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, तसेच त्या आपल्या कामाच्या सहाय्याने घरात आनंददायी दिवाळी साजरी करण्यास हातभार लावतील.

दीर्घकालीन परिणाम - या मोहिमेमुळे जबाबदार पद्धतीने आणि सर्वसमावेशक प्रकारे, सर्वांना बरोबर घेऊन दिवाळी साजरी करण्याची प्रथा भविष्यात सुरू होईल.

चांगुलपणा वाढवण्याच्या अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशन यांच्या मोहिमेचा हेतू मुंबईकरांनी सुरक्षितपणे, आनंददायी वातावरणात आणि चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करणे हा आहे. याला सुरक्षाविषयक प्रशिक्षण, कलाकौशल्याची अभिव्यक्ती आणि समाजसेवा यांची जोड दिल्यामुळे ही मोहीम देखील उत्थान या सीएसआर मोहिमेशी जुळून येईल. त्याद्वारे भारतातील या सर्वांच्या आवडत्या सणादरम्यान सक्षमीकरण तसेच प्रगती साधली जाईल.
 



(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Topics mentioned in this article