जाहिरात

DMart Offers: 'डी-मार्ट' ग्राहकांनी फुल्ल! जून महिन्यात काय आहे खास, ज्यामुळे ग्राहकांची उडालीय झुंबड

दर्जेदार वस्तू आणि किफायतशीर किंमत यांमुळे आगामी काही आठवडे ही गर्दी अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

DMart Offers: 'डी-मार्ट' ग्राहकांनी फुल्ल! जून महिन्यात काय आहे खास, ज्यामुळे ग्राहकांची उडालीय झुंबड
  • जून महिन्यात डी-मार्टमध्ये खास ऑफर्समुळे ग्राहकांची गर्दी नेहमीपेक्षा अधिक वाढली आहे
  • पावसाळी साहित्य आणि शालेय वस्तूंवर आकर्षक सवलती दिल्यामुळे ग्राहकांचा डी-मार्टकडे कल वाढला आहे
  • शाळा सुरू झाल्यामुळे पालक शैक्षणिक साहित्यासाठी डी-मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सध्या डी- मार्टला नेहमी पेक्षा अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. जून महिन्यात डिमार्टमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की ही गर्दी अचानक का वाढली. तर त्याचे उत्तर आहे जून महिन्यातील डी मार्टच्या खास ऑफर्स. जून महिना म्हटला की पाऊस. हे एक समिकरण बनले आहे. शिवाय नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात ही यात महिन्यात होते. त्यामुळे  सध्या 'डी-मार्ट'च्या वेगवेगळ्या मॉल्समध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. डी मार्टमध्ये सध्या पावसाळी साहित्य आणि शालेय वस्तूंमध्ये मोठ मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. 

​पावसाळा आला की छत्री, रेनकोट, गमबूट आणि वॉटरप्रूफ बॅग्सच्या खरेदीची सुरूवात होते. कुठे स्वस्त आणि मस्त साहित्य मिळेल याचा शोध ग्राहक घेत असतात. अशा वेळी त्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे डी मार्ट. या काळात डी मार्टमध्ये काही ऑफर्स दिल्या जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागले असते.  अशा स्थितीत  डी-मार्टने यंदा लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठीच विविध फॅशनेबल आणि टिकाऊ रेनवेअरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या वस्तूंवर आकर्षक सवलती ही देण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेकांचा कल डिमार्टमध्ये खरदी करण्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच जून महिन्यात डी मार्टमध्ये ग्राहकांची झुंबड दिसत आहे. 

नक्की वाचा - Pune News: मिसिंग लिंकवर पहिला मोठा अपघात, तिन कार एकमेकांना धडकल्या, अपघाताचं कारण आलं समोर

​दुसरीकडे, शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. डी-मार्टमध्ये स्कूल बॅग्ज, वह्यांचे सेट, पेन, पेन्सिल बॉक्स, वॉटर बॉटल आणि लंच बॉक्स उपलब्ध आहेत. पण ते नुसते उपलब्ध नाहीत तर त्यावर खास ऑफर्स ही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावस्तून इतर ठिकाणा पेक्षा स्वस्त मिळत आहेत. शिवाय एकाच ठिकाणी हे सर्व साहित्य मिळत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा त्रास पालकांचा वाचत आहे. 

नक्की वाचा - Pune News: मुंबई- पुणे बुलेट ट्रेन! 48 मिनिटांचा सुसाट प्रवास, पुणे हैदराबाद ही जवळ येणार, पुढचा प्लॅन ठरला

​सध्या डी-मार्टच्या सर्वच स्टोअर्समध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. बच्चे कंपनी ही डी मार्टची खरेदी एन्जॉय करताना दिसत आहे. ते आपल्या आवडीच्या वस्तू इथं खरेदी करत आहेत.  विशेषतः शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी डी मार्टमध्ये उसळत आहे. अशा वेळी ही गर्दी नियंत्रित करताना डी मार्टच्या कर्मचाऱ्यांची ही दमछाक होत असल्याचं दिसून आलं आहे. दर्जेदार वस्तू आणि किफायतशीर किंमत यांमुळे आगामी काही आठवडे ही गर्दी अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com