Dmart News : DMart मधून पैसे कमावण्याची मोठी संधी, गहू-तांदूळातून लाखोंची कमाई; बिझनेस मॉडेल जाणून घ्या

तुम्ही कधी विचार केलाय की, ज्या डिमार्टमधून तुम्ही दरमाह हजांरोंचं सामान खरेदी करता, तेच डिमार्ट तुमच्यासाठी दरमाह एका चांगल्या कमाईचं माध्यम ठरू शकतं. हे सत्य आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins

Dmart Business Model : या आठवड्यात DMart ला जायचंय...हे वाक्य दरमहिन्याला तुमच्या घरात ऐकू येत असेल. डिमार्टचं नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर स्वस्त किराण, चांगली सवलत आणि मोठ्या बिलिंग रांगा येतात. सध्याच्या स्थिती डिमार्ट सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार करीत मोठमोठ्या शॉपिंग मॉल्सला टक्कर देत आहे.   

मात्र तुम्ही कधी विचार केलाय की, ज्या डिमार्टमधून तुम्ही दरमाह हजांरोंचं सामान खरेदी करता, तेच डिमार्ट तुमच्यासाठी दरमाह एका चांगल्या कमाईचं माध्यम ठरू शकतं. हे सत्य आहे. डिमार्ट केवळ ग्राहकांसाठीच नाही तर लहान व्यापारी आणि प्रॉपर्टी मालकांसाठीही मोठी संधी देतं. आज आम्ही तुम्हाला दोन सोप्या आणि अधिकृत मार्गांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही DMart मध्ये सामील होऊन नफा कमवू शकता.

Advertisement

डिमार्टचं बिझनेस मॉडेल कुठे आहे? 

डिमार्टचं बिझनेस मॉडेल कसं काम करतं हे जाणून घेणं आवश्यक आहे. डिमार्ट कमी किंमत आणि जास्त विक्री या सिद्धांतावर चालतं. डिमार्ट अशा उत्पादक किंवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या संख्येने सामान खरेदी करतात जे कमी किमतीत चांगली गुणवत्ता असलेले पदार्थ विकतात. यामुळे ग्राहक समाधानी होतात आणि वारंवार येतात. ज्यामुळे डिमार्टची चांगली विक्री होते. हीच जास्त विक्री डिमार्ट आणि सप्लायर्स दोघांना चांगला नफा मिळवून देतं. 

पहिली पद्धत - डिमार्टचे सप्लायर व्हा आणि स्वत:कडील सामानाची विक्री करा..

जर तुम्ही एखादा प्रोडक्ट तयार करीत असाल आणि त्याची गुणवत्ता चांगली असेल तर डिमार्ट तुमच्यासाठी देशभरातली कोटी ग्राहकांपर्यंत तुमची वस्तू पोहोचवेल. उदा. तुम्ही चांगली लोणची, पापड, मसाले किंवा बेकरीचे पदार्थ तयार करीत असाल, तुम्ही तयार केलेले पदार्थ चवदार आणि चांगल्या गुणवत्तेचे असतील तर तुम्ही ते डिमार्टच्या माध्यमातून पोहोचवू शकाल. तुम्ही DMart मध्ये पुरवठादार म्हणून सामील होऊ शकता. जर तुमचे उत्पादन DMart च्या गुणवत्ता मानकांची पूर्तता करत असेल, तर ते त्यांच्या शेकडो स्टोअर्समध्ये विक्रीसाठी तयार होतील. 


डिमार्टचे सप्लायर कसे व्हाल?

अनेकदा अशी चर्चा केली जाते, की डिमार्ट दर मंगळवारी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यासाठी एक खास दिवस ठेवतात. आधी असं होत असावं, मात्र आता डिमार्टने ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि अत्यंत प्रोफेशनल केली आहे. आता तुम्हाला सतत ऑफिरच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. 

स्टेप १ - सर्वात आधी डिमार्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. तेथे "Partner with Us" चा सेक्शन आहे. किंवा तुम्ही थेट https://www.dmartindia.com/partner-with-us या लिंकवर जाऊ शकता. 

Advertisement

स्टेप २ - या पेजवर तुम्हाला Become a Supplier या पर्याय दिसेल. येथे तुम्हाला एक सोपा ऑनलाइन फॉर्म दिसेल. 

स्टेप ३ - या फॉर्ममध्ये तुमची बेसिक माहिती द्या. उदा. नाव, कंपनीचं नाव, मोबाइल नंबर, शहर आणि कोणतं प्रोडक्ट विकायचं आहे त्याची माहिती भरा. 

स्टेप ४ - फॉर्म जमा केल्यानंतर डिमार्टची संबंधित टीम तुमच्या प्रोडक्टच्या कॅटगरीनुसार, तुमचा अर्ज रिव्ह्यू करेल. जर तुमचा प्रोडक्ट त्यांच्या गरजेमुसार असेल तर ते तुमच्याशी संपर्क करतील. 

Advertisement

दुसरी पद्धत - 

तुमची जमीन किंवा दुकान डिमार्टला भाड्याने देणे..

जर तुमच्याकडे रिकामी जमीन, दुकान किंवा कोणतीही मोठी प्रॉपर्टी असेल तर तु्म्हाला दरमाह एक ठराविक उत्पन्न मिळविण्याची चांगली संधी आहे. डिमार्ट भारतात सर्वात जलद गतीने विस्तार करणारी रिटेल चेनपैकी एक आहे. डिमार्ट वारंवार नवी शहरं आणि नव्या ठिकाणांवर स्टोर्स सुरू करीत आहेत. यासाठी त्यांना प्रत्येक शहरात चांगली जमीन, जागा किंवा इमारतीतील जागेची आवश्यता असते. जर तुमच्याकडे अशी कोणती प्रॉपर्टी असेल जी मुख्य रस्त्याला लागून आहे, ज्याच्या जवळपास मोठ्या संख्येने लोक राहत असतील, जिथं पार्किंगची चांगली सुविधा आहे तर डिमार्ट तुम्हाला चांगलं भाडं देऊ शकतं. डिमार्ट केवळ आपल्या स्टोर्ससाठीच नाही तर सामान 
ठेवण्यासाठी वेयरहाऊससाठीही भाड्याने जागा घेते. 

तुमची जागा भाड्याने कशी द्यावी?

ही प्रक्रिया पुरवठादार बनण्यासारखीच आहे. तुम्हाला DMart च्या "Partner with Us" वेबसाइटला (https://www.dmartindia.com/partner-with-us) भेट द्यावी लागेल. "Lease your Property" हा पर्याय निवडा. उघडणाऱ्या फॉर्ममध्ये, तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या मालमत्तेबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागेल, ज्यामध्ये जागा कोणत्या शहरात आहे, तिचे क्षेत्रफळ, ती जमीन आहे की इमारत, आणि तुम्हाला ती विकायची आहे की भाड्याने द्यायची आहे, याचा समावेश असेल.

  • DMart फ्रँचायझी मॉडेलवर काम करीत नाही. त्याची सर्व दुकाने कंपनीच्या मालकीची आहेत. त्यामुळे, फ्रँचायझी देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही जाहिरातींपासून सावध रहा.
  • DMart च्या अधिकृत वेबसाइटवर पुरवठादार म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
  • DMart साधारणपणे मुख्य रस्त्यांवर असलेल्या, उत्तम दळणवळण सुविधा असलेल्या आणि दुकाने व पार्किंग या दोन्हींसाठी पुरेशी जागा असलेल्या, किमान ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या व्यावसायिक जागा शोधते.


 


Topics mentioned in this article