छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या जाचाला कंटाळून डॉक्टर पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. हुड्यांची मागणी आणि सतत चारित्र्यावर संशय यातून 27 वर्षीय विवाहितेने टोकाचा निर्णय घेतला आहे. डॅा. प्रतिक्षा प्रीतम गवारे असं मृत विवाहितेचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील करजंखेडा येथे ही घटना आहे.
आत्महत्येपूर्वी प्रतीक्षा यांनी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. त्यात अनेक आरोप त्यांनी आपला पती प्रीतम गवारेवर केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गन्हा केला आहे.आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुसाईड नोटमधील माहितीनुसार, प्रीतम आपल्या पतीवर सतत संशय घेत असे. सतत तिला फोन करुन कुठे आहे, काय करते अशी विचारणा करुन तिच्यावर एकप्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. पतीकडून सतत हुंडा आणि फर्निचरसाठी तगादा लावला जात होता.याच त्रासाला कंटाळून प्रतीक्षा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी रविवारी प्रतीक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रीतम गवारे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकाश भुसारे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा आणि प्रीतम यांचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून प्रतीक्षाला प्रीतम हुंड्याच्या पैशांवरून आणि घरातील फर्निचरवरून प्रचंड त्रास देत होता. तसेच प्रतीक्षाच्या चारित्र्याच्या संशयावरुन त्रास द्यायचा.
प्रतीक्षा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रीतम गवारेविरोधात हुंडा बळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहे.
...राजकीय दबाव टाकतील
डॉ. प्रतीक्षा यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं की, "पप्पा, ते त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी राजकीय दबाव टाकतील. त्याच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील. तुम्ही लढू नका. तुम्ही फक्त खुशीने जगा, तुम्ही लढून नका. माझा न्याय मी स्वत: घेऊन."