Dombivali News: पहलगाम हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, आता भारत पाकिस्तान मॅच, लेकानं दिली अशी प्रतिक्रिया की...

शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यभरात त्यासाठी निदर्शने केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
डोंबिवली:

आशिया कपसाठी भारत पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तान सामना झाला नाही पाहिजे यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहे. डोंबिवलीतील तीन पर्यटक पेहलगाम अतिरेकी हल्ल्यात मारले गेले होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने ठिकठिकाणी बॅनर लावले  आहेत. देशाच्या पंतप्रधानांना सिंदूर पाठवत आंदोलन करण्यात आलं आहे. या सामन्यावर पेहलगाम हल्ल्यात मारले गेलेले संजय लेले यांचा मुलगा हर्षल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षलची प्रतिक्रीया बोलकी आहे. सध्या डोंबिवलीत त्याच्यात प्रतिक्रीयेची चर्चा होत आहे. 
 
डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी  हे कुटुंबासह काश्मीर येथील पेहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. त्याच वेळी दहशतवाद्यांनी पहलगाम इथे भ्याड हल्ला केला होता. त्या हल्लात या तिघांचा ही मृत्यू झाला होता. या नंतर पाकिस्तान विरोधात देशात प्रचंड रोष दिसून आला. पाकिस्तान सोबत कोणत्या प्रकारचे संबंध ठेवायचे नाही अशी ठाम भूमिका देशातील नागरीकांनी घेतली. 

नक्की वाचा - IND vs PAK: पाकिस्तानचा 'हा' फलंदाज भारताचं टेन्शन वाढवणार? शाहीद आफ्रीदीचा थेट इशारा

परंतू आत्ता आशिया कपच्या माध्यमातून भारत पाक सामना आज दुबईत होणार आहे. या सामन्याच्या आधी देशात विरोध सुरु झाला आहे. या सामन्याला भारतीयांनी प्रचंड विरोध केला आहे. बीसीसीआयला विनंती केली आहे की, हा सामना झाला नाही  पाहिजे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यभरात त्यासाठी निदर्शने केली जात आहे.  राज्यभरातून शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना सिंदूर  पाठवला आहे. 

नक्की वाचा - Shahid Afridi : आशिया कपपूर्वी शाहिद आफ्रिदीची भारतावर आगपाखड; 'सडके अंडे' म्हणत दिग्गज खेळाडूला डिवचले

डोंबिवलीत  शनिवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी संपूर्ण शहरात बॅनरबाजी करुन डोंबिवलीत कोणीही हा सामना बघणार नाही. अतिरेकी हल्ल्यात मृ्त्यूमुखी पडलेले संजय लेले यांचा मुलगा हर्षल यांनी प्रतिक्रीया देताना भारत पाकिस्तान सामन्यवर भाष्य केले होते. तो म्हणाला पाकिस्तान सोबत कोणताही सामना खेळता कामा नये. हा सामना  झाला नाही पाहिजे असे आपले व्यक्तिगत मत असल्याचं तो म्हणाला. खेळात राजकारण नाही आणले पाहिजे. जो पर्यंत पूर्ण बहिष्कार टाकत नाही. तोपर्यंत पाकिस्तान सुधारणार नाही. एशिया कप सामन्यावर बहिष्कार टाकला पाहिजे असं तो म्हणाला होता.