जाहिरात

Dombivli News: डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर नव्या वादाची ठिणगी; 'त्या' बॅनरमुळे राजकीय वातावरण पेटणार?

Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Dombivli News: डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर नव्या वादाची ठिणगी; 'त्या' बॅनरमुळे राजकीय वातावरण पेटणार?
Dombivli News: डोंबिवलीत या बॅनरची जोरदार चर्चा आहे.
डोंबिवली:

Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या वादात डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौकात झळकलेल्या एका बॅनरची भर पडली असून, सध्या संपूर्ण शहरात या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. या बॅनरच्या माध्यमातून शहरातील सरकारी आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेवर अत्यंत खोचक आणि अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.

काय आहे बॅनर?

सम्राट चौकात लावण्यात आलेल्या या बॅनरवर लिहिलेला मजकूर चांगलाच चर्चेत आला आहे. "मोठमोठ्यांना गार केलं गंमत मधी म्हणणाऱ्यांना 17 वर्षांत सरकारी रुग्णालय सुसज्ज करता आलं नाही, ही खरी शोकांतिका," अशा शब्दांत कोणाचेही नाव न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या 17 वर्षांत महापालिकेच्या आरोग्य सुविधांचा दर्जा का सुधारला नाही, असा थेट सवाल या माध्यमातून उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: आधी डिस्चार्ज ठरला, मग अचानक निर्णय बदलला; अटकेत असलेल्या Ramesh Mhatre ला वाचवतोय तरी कोण? )

या बॅनरवर पुढे असेही लिहिले आहे की, साहेब डॉक्टरवर हात उचलणं चुकलंच. खरं आहे तुम्ही एका गरिबाच्या मदतीला धावून आलात, पण डॉक्टरवर हात उचलणं योग्य नव्हतं. मात्र एक गोष्ट मान्य करावी लागेल की, तुमच्या या कृतीमुळे शास्त्रीनगर रुग्णालयातील दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आता तरी रुग्णालयातील सुविधा वाढतील आणि तिथला दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आहे. या मजकुरामुळे डोंबिवलीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

( नक्की वाचा : पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवले; कालपर्यंत पाया पडणारे Ramesh Mhatre आज डॉक्टरांच्याच जीवावर उठले! )

महापालिका रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून राजकारण तापले

शिवसेना  नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीत विविध राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. या मारहाणीच्या पार्श्वभूमीवरच हा बॅनर लावण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या बॅनरच्या माध्यमातून महापालिका रुग्णालयाच्या दुरवस्थेवर बोट ठेवत स्थानिक नेत्यांना थेट घेरण्याचा प्रयत्न अज्ञात नागरिकांनी किंवा राजकीय विरोधकांनी केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com