Dombivli News: डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! रमेश म्हात्रेचा जामीन मंजूर कसा झाला? वाचा Inside Story

Dombivli Doctor Assault Case: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dombivli Doctor Assault Case: शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झाला आहे.
डोंबिवली:

Dombivli Doctor Assault Case: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी हा निर्णय दिला. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण डोंबिवली आणि कल्याण परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. 

म्हात्रे यांना 14 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, परंतु आता त्यांना 50 हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर जामीन मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांचा तीव्र विरोध असतानाही न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना नेमका कोणत्या कारणांमुळे जामीन मंजूर केला, हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.

Advertisement

कोणते कारण ठरले महत्त्वाचे?

न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षाने म्हात्रे यांच्या जामिनाला तीव्र विरोध केला होता. त्यांना जामीन दिल्यास समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना कोठडीतच ठेवण्यात यावे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

मात्र, म्हात्रे यांच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांच्या फौजफाट्याने न्यायालयासमोर अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. म्हात्रे यांचे वय 73 वर्षे असून त्यांची प्रकृती ठीक नसते, याकडे वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. वाढते वय आणि आजारपण हा त्यांच्या जामिनाचा एक मुख्य आधार ठरला.

बचाव पक्षाचे वकील  गणेश पाटील, मुजाहिद काझी आणि आनंद पत्की यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, ज्या दिवशी शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली, त्या दिवशी रमेश म्हात्रे तिथे कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने गेले नव्हते. उलट त्यांना तिथे बोलावण्यात आले होते. रुग्णालयात घडलेली ती घटना अत्यंत दुर्दैवी होती, पण त्यात म्हात्रे यांचा कोणताही पूर्वनियोजित कट किंवा हेतू नव्हता, हे वकिलांनी कोर्टाला पटवून दिले.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर नव्या वादाची ठिणगी; 'त्या' बॅनरमुळे राजकीय वातावरण पेटणार? )

जुने गुन्हे आणि निर्दोष मुक्ततेचा दाखला

सरकारी पक्षाने रमेश म्हात्रे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा दाखला देत जामिनाला विरोध केला असला, तरी बचाव पक्षाने तो दावा खोडून काढला. म्हात्रे यांच्यावर दाखल असलेल्या अनेक जुन्या प्रकरणांमध्ये त्यांची न्यायालयातून आधीच निर्दोष मुक्तता झाली आहे, हा मुद्दा बचाव पक्षाने अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यामुळे जुन्या प्रकरणांच्या आधारे त्यांना जामीन नाकारता येणार नाही, हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

Advertisement

( नक्की वाचा : पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवले; कालपर्यंत पाया पडणारे Ramesh Mhatre आज डॉक्टरांच्याच जीवावर उठले! )

 इतर आरोपींची परिस्थिती काय?

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दुपारी आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर रमेश म्हात्रे यांचा जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर 3 आरोपींना मात्र अजून जामीन मिळालेला नाही. त्यांच्या वकिलांकडूनही लवकरच जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Topics mentioned in this article