जाहिरात

Kalyan News: BPचा त्रास, 1 किडनी अन् दर 6 तासांनी तपासणी! कोर्टात मारकुट्या रमेश म्हात्रेने युक्तीवाद काय?

अशा स्थितीत त्यांनी पोलिस कोठडी देवू नये. त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी म्हात्रे यांच्या वकीलाने केली.

Kalyan News: BPचा त्रास, 1 किडनी अन्  दर 6 तासांनी तपासणी! कोर्टात मारकुट्या रमेश म्हात्रेने युक्तीवाद काय?
  • डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रे यांना अटक
  • रमेश म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले
  • रमेश म्हात्रे याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली
कल्याण:

अमजद खान 

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे सध्या चर्चेत आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सला मारहाण करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी माध्यमांच्या दबावानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला आणि त्याच्या साथीदारांना आज शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या सोबत त्याच्या तिन साथिदारांचीही रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. पण या सुनावणी वेळी कोर्टात काय घडलं ते आपण जाणून घेणार आहेत. पोलिस कोठडी मिळू नये म्हणून रमेश म्हात्रेने काय युक्तीवाद केला ते आपण पाहणार आहोत. 

रमेश म्हात्रे याला कल्याण कोर्टात न्यायाधीश श्रीमती के. एस. कातकडे यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी  कोर्टात प्रचंड गर्दी होती. कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. कोर्टात फक्त न्यायाधीशांसमोर सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील, सरकारी वकील आणि तपास अधिकारी होते इतरांना सुनावणी दरम्यान हजर राहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी आपली बाजू आधी मांडली. रमेश म्हात्रे  आणि या आधी अटक करण्यात आलेले त्याचे साथिदार यांची एकत्र बसवून चौकशी करायची आहे, असं त्यांनी सांगितलं.  त्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. 

नक्की वाचा - Trending News: ही डॉक्टर तर वाघीण निघाली! थेट पिंजऱ्यात घुसून नरभक्षी वाघीणीला केलं जेरबंद, पिंजऱ्यातला थरार

यावर रमेश म्हात्रे यांच्या वकीलांनी आक्षेप घेतला. दोन दिवसांपूर्वी रमेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. ते पोलीस कोठडीत होते. त्यांची पोलिस कोठडी मागण्यात आली आहे त्यात नवीन असा मुद्दा नाही. ती चौकशी झाली आहे. शिवाय रमेश म्हात्रे यांनी जे कृत्य हॉस्पिटलमध्ये केले ते जाणीवपूर्वक केले नाही. ते रागाच्या भरात झाले असंही त्यांनी कोर्टात सांगितलं. शिवाय रमेश म्हात्रे यांनी बीपीचा त्रास आहे. त्यांना एकच किडणी आहे. त्यामुळे त्यांची दर सहा तासाने तपासणी करावी लागते. अशा स्थितीत त्यांनी पोलिस कोठडी देवू नये. त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी म्हात्रे यांच्या वकीलाने केली. 

नक्की वाचा - Pune News: कुणाचा पती, कुणाचा भाऊ, तर कुणाचे वडील! 48 तासानंतर ही ते ढिगाऱ्याखालीच, कुटुंबीयांचा टाहो

त्या दिवशी गर्भवती महिला आणि तिची आई हॉस्पिटलमध्ये गेली होती. मात्र तिथे त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत. याबाबत म्हात्रे यांनी डॉक्टरांना फोन केला. मात्र डॉक्टरांनी फोन उचलला नाही. मग रमेश म्हात्रे हॉस्पिटलमध्ये आले. तिथे ही त्यांना  चुकीची वागणूक दिली गेली असा दावा रमेश म्हात्रे यांच्या वकीलाने कोर्टात केला. त्यानंतर जे काय घडलं ते रागाचा भरात घडलं. त्यामागे उद्देशून काही केलं गेलं नाही.  त्यामुळे रमेश म्हात्रे  आणि  इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी वकीलांनी लावून धरली. दरम्यान  कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून निर्णय दिला. चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. म्हात्रे याची दर सहा तासाने  तपासणी व्हावी याची काळजी पोलिसांनी घ्यावी. डॉक्टरांची गरज असल्यास डॉक्टर देखील उपलब्ध करावा असे निर्देश कोर्टाने दिले.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com