अमजद खान, प्रतिनिधी
अनधिकृत बांधकामं आणि भू-माफियांची दादागिरी हा कल्याण-डोंबिवली (KDMC) महापालिका परिसरातील गंभीर प्रश्न आहे. हापालिका हद्दीतील रेरा प्रकरणातील 65 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेस नोव्हेंबर 2024 मध्ये दिले आहेत. या भागातील अनेक नागरिकांना याचा फटका बसला आहे. त्यातच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर डोंबिवलीतील भू-माफियांनी सात मजल्याची बेकायदा इमारत उभी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याण शीळ फाटा रस्त्यालगत असलेल्या दावडी परिसरातील व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशंवत आंबेडकर यांच्या नावे जागा आहे. या जागेच्या महसूली कागदपत्रांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, रमाई तेलतुंबडे यांची नावे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेली जागेवर भू-माफियांनी सात मजली इमारत उभी केली आहे. या बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिका आयुक्त, तहसीदार, पोलिस आयुक्त यांच्यासह सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. ही बेकायदा इमारत पाडण्यात यावी. बेकायदा इमारत उभारणाऱ्यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार )
या प्रकरणी बांधकाम करणाऱ्या ललित महानज याला महापालिकेने नोटिस बजावली होती. त्यांनी त्यांच्या बांधकामाची कागदपत्रे सादर करा असे सांगितले होते. त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. त्यानंतर महापालिकेने सात मजली इमारत बेकायदा ठरविली आहे. ही इमारत बेकायदा ठरविल्यावर संबंधितांनी ती स्वत: पाडून टाकावी अशी नोटिस महापालिकेने बजावली. त्याला महाजन यांनी कोणताही प्रतिसाद आला नाही.
सात मजली बेकायदा इमारत पाडण्याकरीता मानपाडा पोलिसांकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. येत्या 20 मे रोजी ही इमारत पाडण्याची कारवाई केली जाणार आहे अशी माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे.