जाहिरात

Kalyan News: कल्याणमध्ये भाजपाला घरचा आहेर! मित्रपक्षानेच पाडले खिंडार, निष्ठावंतांचा पक्षाला राम राम !

Dombivli News: स्थानिक राजकारणातील अंतर्गत अंतर्गत मतभेद आणि युतीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय पटलावर एक मोठी उलथापालथ घडली आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये भाजपाला घरचा आहेर! मित्रपक्षानेच पाडले खिंडार, निष्ठावंतांचा पक्षाला  राम राम !
Dombivli News: कल्याण डोंबिवलीत मित्रपक्षानंच भाजपाला खिंडार पाडलं आहे.
डोंबिवली:

Dombivli News: स्थानिक राजकारणातील अंतर्गत अंतर्गत मतभेद आणि युतीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय पटलावर एक मोठी उलथापालथ घडली आहे. महायुतीतील मुख्य मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (शिंदे गट) भारतीय जनता पक्षाला मोठा आणि ऐन मोक्याच्या वेळी धक्का दिला आहे. वर्षांनुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अखेर भाजपला रामराम ठोकल्याने कल्याणमधील भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत पार पडला भव्य पक्षप्रवेश सोहळा

डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात भाजपच्या अनेक प्रमुख चेहऱ्यांनी अधिकृतपणे धनुष्यबाण हाती घेतला. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे, कल्याण पूर्वचे वरिष्ठ पदाधिकारी गणेश पगारे, युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष राकेश देशमुख आणि श्याम म्हात्रे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. भाजपच्या या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या एक्झिटमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात पक्षाच्या स्थानिक बांधणीला मोठा सुरुंग लागल्याचे मानले जात आहे.

( नक्की वाचा : KDMC News: केडीएमसीत राजकीय भूकंप! ठाकरे गट अन् मनसे आले एकत्र; भाजपाने दिला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा )

महेश गायकवाड यांची रणनीती अन् महायुतीत राजकीय भूकंप

भाजपच्या या निष्ठावंतांना आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे. दीर्घकाळापासून पक्षात दुर्लक्षित राहिलेले आणि स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेले कार्यकर्ते महेश गायकवाड यांच्या मध्यस्थीने शिंदे गटात दाखल झाले. प्रवेशकर्त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आणि स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांवर पूर्ण विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

मित्रपक्षानेच अशा प्रकारे थेट भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला खिंडार पाडल्याने कल्याणमधील भाजपसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय झटका मानला जात आहे. या अचानक झालेल्या पक्षांतरामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद कितपत टिकून राहते, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या या सामूहिक रामराम नंतर आता भाजपचे स्थानिक आणि वरिष्ठ नेतृत्व या धक्क्याला कसे सामोरे जाते आणि काय प्रतिक्रिया देते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com