- अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli Suicide: डोंबिवली शहरातून एक अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून आणि पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून एका 36 वर्षीय तरुणाने महावितरणच्या वीज वितरण बॉक्समध्ये (DP) हात घालून आपली जीवनयात्रा संपवली. ही भीषण घटना डोंबिवली पश्चिम येथील नवसंपदा इमारतीसमोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तरुणाने का संपवलं आयुष्य?
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान कांबळे असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून समाधान हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, काही दिवसांपूर्वी पत्नी समाधानला सोडून माहेरी गेली होती. पत्नी परत येत नसल्याने समाधान खचून गेले होते. याच विरहातून आणि मानसिक त्रासातून त्यांनी हे भयानक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
(नक्की वाचा: Dombivli News: डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलचं 12 वर्षांपूर्वीचं कांड उघड, तरुणाची हत्या, बारवी धरण अन्...)
परिसरात भीतीचे वातावरण
समाधान यांनी रस्त्या कडेला असलेल्या महावितरणच्या वीज वितरण बॉक्समध्ये (DP Box) थेट हात घातला. विजेचा जोरदार झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच विष्णू नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
Photo Credit: NDTV Marathi
(नक्की वाचा: KDMC News: केडीएमसीमध्ये लाचखोरीची पन्नाशी पूर्ण! 40 हजारांसाठी लिपिकाने स्वाभिमान विकला)पोलिसांकडून तपास सुरूविष्णू नगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेम रिपोर्टसाठी पाठवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.