पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवले; कालपर्यंत पाया पडणारे Ramesh Mhatre आज डॉक्टरांच्याच जीवावर उठले!

Dombivli News:   नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या आयुष्यातील एक असा प्रसंग समोर आला आहे, जो पाहून 'उपकाराची परतफेड अपकाराने' कशी केली जाते, याचाच प्रत्यय येतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ramesh Mhatre : रमेश म्हात्रे यापूर्वी डॉक्टरांच्या पाया पडत असत.
डोंबिवली:

Dombivli News:  ज्या डॉक्टरांनी दोनवेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून नवीन आयुष्य दिलं, ज्यांच्या कृतज्ञतेपोटी ते नेहमी पाया पडायचे, आज त्याच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर हात उगारल्यामुळे डोंबिवलीचे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे चांगलेच अडचणीत आले आहेत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर 3 आरोपींना कल्याण न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्ताने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या आयुष्यातील एक असा प्रसंग समोर आला आहे, जो पाहून 'उपकाराची परतफेड अपकाराने' कशी केली जाते, याचाच प्रत्यय येतो.

डॉक्टरांनी वाचवला होता जीव

हत्या आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रमेश म्हात्रे यांच्यावर 2008 मध्ये एक जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या हल्ल्यात त्यांच्या शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली होती, तरीही ती थेट पोटात घुसली होती. म्हात्रे मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी रात्री-अपरात्री तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकेच नाही, तर त्याआधी झालेल्या एका जुन्या हल्ल्यात म्हात्रे यांची एक किडनी निकामी झाली होती. त्यावेळीही डॉक्टरांनी अत्यंत शिताफीने शस्त्रक्रिया करत त्यांची एक किडनी काढून त्यांना जीवदान दिले होते.

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli News: आधी डिस्चार्ज ठरला, मग अचानक निर्णय बदलला; अटकेत असलेल्या Ramesh Mhatre ला वाचवतोय तरी कोण? )
 

पाया पडणारे बाहुबली थेट जीवावर उठले

डॉक्टरांनी केलेल्या या उपकारामुळे रमेश म्हात्रे जेव्हा कधी डॉ. शिरोडकर यांना समोर पाहायचे, तेव्हा कृतज्ञतेपोटी थेट त्यांचे पाय धरत असत. मात्र, कालपर्यंत डॉक्टरांचा असा आदर करणारे 'बाहुबली' नगरसेवक म्हात्रे आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर म्हणजेच रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हात उचलल्यामुळे थेट पोलीस कोठडीत पोहोचले आहेत. त्यांच्या या बदलेल्या रूपामुळे आणि विरोधाभासामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सध्या म्हात्रेंच्या जुन्या इतिहासाची जोरदार चर्चा रंगली आहे.

2 डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे

शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने महिला डॉक्टरशी वर्तणूक केली, शिवीगाळ आणि मारहाण केली, त्याचा तीव्र धक्का वैद्यकीय वर्तुळाला बसला आहे. या घटनेचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रुग्णालयातील डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंके यांनी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी आणि नर्सेस प्रचंड मानसिक दडपणाखाली आणि अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.

( नक्की वाचा : डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक झालेले रमेश म्हात्रे कोण आहेत? वाचा डोंबिवलीतील मातब्बर नेत्याचा संपूर्ण इतिहास )
 

रमेश म्हात्रेंना पोलीस कोठडी

या गुन्ह्यात अटक होईल या भीतीने रमेश म्हात्रे उच्च रक्तदाब आणि इतर आजारांचे कारण पुढे करत कळवा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. गेल्या सुनावणी दरम्यान ते ऑनलाईन हजर राहिले होते, मात्र कल्याण सत्र न्यायालयातील कोर्ट हॉल क्रमांक 6 चे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश के. एस. कातकडे यांनी म्हात्रेंना 'प्रत्यक्ष' कोर्टात हजर करण्याचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी म्हात्रेंना थेट कल्याण कोर्टात आणले. कोर्टात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि इतर 3 आरोपींना 4 दिवसांची म्हणजेच 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 


Topics mentioned in this article