अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli Unauthorized buildings issue : डोंबिवलीतील 65 इमारती बेकायदेशीर जाहीर करण्यात आल्या आहेत. या इमारतीमधील रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या नागरिकांना आता कसं जगायचं हा प्रश्न पडला आहे. त्याचवेळी या प्रकरणात खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलिस प्रोटेक्शनमध्ये फिरतोय ही दुर्दैव आहे. सर्वात आधी अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.
म्हात्रे यांनी आज (मंगळवार, 18 फेब्रुवारी 65 बेकायदा इमारतीमधील नागरीकंसह केडीएमसी (KDMC) आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी दोषी असतील असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे इमारतींची सध्याची परिस्थिती?
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील 65 बेकायदा इमारती प्रकरणात केडीएमसी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिली. 65 पैकी 10 इमारती पाडल्या आहे. पाच इमारती महापालिकेच्या हद्दीबाहेरील आहे. 3 इमारती अस्तित्वात नाही. 47 इमारतीत नागरीकांचा रहिवास आहे. नागरीकांकडे सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा आहे.
सध्या हायकोर्टाने जे आदेश दिले आहे. त्यावर कारवाई सुरु आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी इमारतीतील रहिवासी शिष्टमंडळासाेबत केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. नागरीकांना दिलास कसा मिळेल यावर चर्चा करण्यात आली. इतकेच नाही तर या घोटाळ्याचा मूख्य सूत्रदार आणि खोट्या कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्या विरोधात कारवाई कधी करणार असा सवाल म्हात्रे यांनी आयुक्तांकडे उपस्थित केला.
( नक्की वाचा : KDMC News डोंबिवलीकरांनी काय करायचं? बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना मिळाली मालमत्ता कर भरण्याची नोटीस )
महापालिका आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. दीपेश म्हात्रे यांनी ज्या व्यक्तीचे नाव घेतले आहे. त्याचे नाव सुजीत नलावडे असे आहे. तो सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे. या आरोपीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. त्याला तात्काल अटक करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.