Viral Photo थांबा जरा..तुम्हीही GPS चा वापर करून वाहन चालवताय? Google मॅपने चालकाला दाखवला सर्वात खतरनाक रस्ता

Google Map Viral News : ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे,ते लोक गुगल मॅप लावून लोकेशनवर पोहोचतात.पण एका चालकासोबत असं काही घडलं आहे, जे वाचून तुम्हाही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Google Map Viral News
मुंबई:

Google Map Viral News : आजच्या डिजिटल युगात अनेक लोक स्मार्ट फोनचा वापर करून स्मार्ट व्हायचा प्रयत्न करतात. म्हणजेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे,ते लोक गुगल मॅप लावून लोकेशनवर पोहोचतात.पण एका चालकासोबत असं काही घडलं आहे, जे वाचून तुम्हाही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. जीपीएस सिस्टममुळे या चालकासोबत जे घडलं, त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. जीपीएसने दाखवलेल्या रस्त्याचे फोटो पाहून अनेकांना घामच फुटला आहे. इतके भयानक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 

गुगल मॅपने त्या चालकाला नेमका कोणता रस्ता दाखवला?

गुगल मॅपच्या शॉर्टकटचे रात्रीच्या अंधाराचे फोटो एका चालकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो व्हायरल होताच लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही यूजर्सने या रस्त्याला हॉन्टेड रोड असं म्हटलं आहे. तर काही लोकांनी या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. रेडिट यूजरने गुगल मॅप फॉलो केल्यानंतर शॉर्टकट रस्त्याचे 4 फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने म्हटलंय, गुगल मॅपने मला एक शॉर्टकट रस्ता दाखवला. जो आता उपलब्धच नाहीय. रात्रीच्या अंधारातील या फोटोंमध्ये काही ठिकाणी लाईट असल्याचं दिसत आहे.

नक्की वाचा >> Funny Video 'अभ्यास केला नाही तर काय होईल?', चिमुकलीनं उत्तर देताच शाळेतील मॅडम कोमात अन् विद्यार्थी जोमात

पण रस्त्याच्या अनेक ठिकाणी अंधारच असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यांना पाहून रात्रीच्या अंधारात कोणीही घाबरू शकतो. एका यूजरने असंही म्हटलं आहे की,हा रस्ता आता बंद आहे. अशातच रात्रीच्या वेळी या रस्त्यावर जाणं धोकादायक ठरू शकतं. @half-Asmodeus नाम के यूजर ने r/indiasocial रेडिटवर हे फोटो शेअर केले आहेत.

Advertisement

इथे पाहा व्हायरल पोस्ट

यूजरने ही पोस्ट शेअर करत म्हटलंय, गुगल मॅमचं शॉर्टकट..जे एखाद्या हॉरर फिल्मच्या सुरुवातीसारखं वाटलं..ही पोस्ट व्हायरल होताच, यूजर्सने वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलंय, फिल्डिंग सेट आहे भावा..घरी पोहोचताच एक डायनही सोबत असेल..दुसऱ्या यूजरने म्हटलंय, देवा या लोकांचं रक्षण कर. अनेक यूजर्सने या पोस्टच्या मिम्सही व्हायरल केल्या आहेत. 

नक्की वाचा >> हा काय प्रकार! सिडकोने मुख्यमंत्री कार्यालयाला दिली दिशाभूल करणारी माहिती, लॉटरी धारकांची झाली फसवणूक