अविनाश पवार, प्रतिनिधी
Malshej Ghat Viral Video : पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातील करंजाळ परिसरात रविवारी काही पर्यटक तरुणांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.या घटनेत मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे,मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशीही काही तरुणांनी अरेरावी करत हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मद्यधुंद तरुणाला केली मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार,करंजाळ येथे खचलेल्या रस्त्याजवळ काही स्थानिक तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.हा वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचला.यावेळी मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाला मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
नक्की वाचा >> Pune News: 'इतके मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी..', चंद्रकांत पाटील यांचं पुण्यातील भाषण प्रचंड चर्चेत
पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
मात्र,तेथे उपस्थित काही तरुणांनी पोलिसांशीही हुज्जत घालत दमबाजी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या गोंधळानंतर पोलिसांनी तत्काळ कोणतीही कारवाई न करता तेथून निघून गेल्याची चर्चा परिसरात आहे.या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित तरुणांविरोधात पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.