Baramati News: बारामतीत 'या' मार्गावर मोठा अनर्थ टळला, समोरून येणाऱ्या गाड्या कशाबशा वाचल्या, पाहा थरारक Video

बारामती तालुक्यातील माळेगाव -कऱ्हावाघज रोडवर एका मद्यधुंद ट्रक चालकाने हैदोस घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.दारूच्या नशेत गाडी चालवल्याने ट्रक पलटी झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Baramati Truck Accident Video

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Baramati Truck Accident Video : बारामती तालुक्यातील माळेगाव -कऱ्हावाघज रोडवर एका मद्यधुंद ट्रक चालकाने हैदोस घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.दारूच्या नशेत गाडी चालवल्याने ट्रक पलटी झाला. या मद्यधुंद ट्रक चालकासोबत आणखी एक व्यक्ती प्रवास करत होता. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दारूच्या नशेत बेभान झालेला हा ट्रक चालक ज्या पद्धतीने वाहतुकीच्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करत होता, ते पाहून तुमच्याही जीवाचा थरकापच उडेल.सुदैवाने समोरून येणाऱ्या गाड्या या अपघातातून वाचल्या आहेत आणि मोठा अनर्थ टळला गेलाय.

मद्यधुंद चालकाने ट्रकचा वेग वाढवला अन्..

व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रथम असे दिसून येत आहे की, माल वाहतूक करणारा एक ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत आहे.त्यानंतर पाठीमागे चालणाऱ्या वाहन चालकांच्या लक्षात येते की त्याने मद्यपान केलं आहे.त्यानंतर पाठीमागून येणारे वाहन चालक सावध होतात.त्यापैकी एका वाहन चालकाने व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.नशेत असलेला चालक बेजबाबदारपणे वाहन चालवत होता.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये अनधिकृत इमारतींचं जाळं पसरवलं, 'तो' खतरनाक बिल्डर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

इथे पाहा ट्रक अपघाताचा थरारक व्हिडीओ

काही अंतर पार केल्यानंतर रस्त्याच्या मधोमध हा ट्रक एकाएकी अपघात होऊन पलटी झाला. समोरून येणाऱ्या वाहन चालकांचा जीव मात्र यावेळी टांगणीला लागला होता.सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.दैव बलवत्तर म्हणून समोरून येणारे वाहन चालक या मद्यधुंद ट्रक चालकाच्या या जीवघेण्या थरारातून वाचले आहेत.

नक्की वाचा >> Jalna News: अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांना अटक, छत्रपती संभाजीनगरात लावला होता ट्रॅप, 'ते' एक प्रकरण भोवलं