Vikhroli Flyover : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, इंधन अन् वेळही वाचणार; आजपासून विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीस खुला

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या निर्देशानुसार कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीस खुला होणार आहे. आज सायंकाळी चार वाजेपासून वाहनांना या पुलाचा वापर करता येणार आहे. मात्र या उड्डाणपुलावरुन श्रेयवादाची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या निर्देशानुसार कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Education City: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, 5 विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र

पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व - पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहे. यामुळे प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. या पुलामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरुन पवईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील प्रवाशांना हा पूल फायद्याचा ठरणार आहे. 

Topics mentioned in this article