Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला आकाशात वादळाचा विळखा; 8 जणांचा जीव टांगणीला! वाचा लेटेस्ट अपडेट

Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी दुपारी खराब हवामानाचा मोठा फटका बसला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Eknath Shinde: हेलिकॉप्टर हवेत असतानाच कल्याण परिसरात अचानक जोरदार वादळी वारे सुरू झाले.

विशाल पाटील, प्रतिनिधी


Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी दुपारी खराब हवामानाचा मोठा फटका बसला. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, वैमानिकाने दाखवलेले कौशल्य आणि प्रसंगावधान यामुळे हे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले होते.

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी नियोजित दौऱ्यासाठी निघाले होते. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलीपॅडवरून त्यांनी हेलिकॉप्टरने उड्डाण केले. एकनाथ शिंदे यांचा हा दौरा कल्याण आणि मुरबाड परिसरासाठी आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत असतानाच, हेलिकॉप्टर कल्याण परिसराच्या जवळ पोहोचले आणि अचानक निसर्गाचा कोप पाहायला मिळाला.

Advertisement

( नक्की वाचा : KDMC News: 'स्वतःच्या बुडाखालचा अंधार पाहा, किती लफडी...'; केडीएमसीत शिवसेना नेत्यांमध्येच ठिणगी! प्रकरण काय? )

वादळी वाऱ्याचा तडाखा आणि थरार

हेलिकॉप्टर हवेत असतानाच कल्याण परिसरात अचानक जोरदार वादळी वारे सुरू झाले. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की हेलिकॉप्टर त्यामध्ये अडकले. अशा कठीण परिस्थितीत हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक होते. 

मात्र, हेलिकॉप्टरच्या पायलटने आपले सर्व कौशल्य पणाला लावले आणि हेलिकॉप्टरला तात्काळ त्या वादळाच्या तडाख्यापासून दूर नेले. पायलटने कोणताही धोका न पत्करता हेलिकॉप्टर जुहू एअरपोर्टच्या दिशेने वळवले आणि तिथे अत्यंत सुरक्षितपणे लँडिंग केले.

हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते?

या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे महत्त्वाचे ताफा उपस्थित होता. यामध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रूडकर, ओएसडी राजपूत आणि मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्यासह एकूण 8 जण हेलिकॉप्टरमध्ये होते. या सर्वांचा जीव काही काळ टांगणीला लागला होता, मात्र लँडिंग झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सुदैवाने या घटनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. जुहू एअरपोर्टवर उतरल्यानंतर सर्वांची तपासणी करण्यात आली. खराब हवामानामुळे हा दौरा काही काळासाठी विस्कळीत झाला असला तरी, शिंदेंच्या सुरक्षिततेची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Advertisement

पाहा Video

Topics mentioned in this article