जाहिरात

Viral Video: वृद्धाने 'त्या' मेट्रो स्टेशनवर महिलेसमोरच केला घाणेरडा प्रकार,म्हणाला, "तुला जे करायचे ते कर.."

दिल्लीच्या कालकाजी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली. येथे एका वुद्धाने घाणेरडं कृत्य करत लिफ्टमध्ये लघवी केली. वृद्धाने हा प्रकार चक्क महिलेच्या समोरच केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video: वृद्धाने 'त्या' मेट्रो स्टेशनवर महिलेसमोरच केला घाणेरडा प्रकार,म्हणाला, "तुला जे करायचे ते कर.."
Kalkaji Metro Station Viral Video

Kalkaji Metro Station Viral Video : दिल्लीच्या कालकाजी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली. येथे एका वुद्धाने घाणेरडं कृत्य करत लिफ्टमध्ये लघवी केली. वृद्धाने हा प्रकार चक्क महिलेच्या समोरच केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. महिलेनं या वृद्धाचा व्हिडीओ काढून त्याला चांगलच सुनावलं.परंतु, त्या वृद्धाने माफी मागण्याऐवजी त्या महिलेला धमकी दिली. "तुला जे करायचे ते कर", असं वृद्ध व्यक्ती त्या महिलेला म्हणाला.

लोकांनी दिल्या संतापजनक प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांनी संतापजनक प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हायरल घटनेनंतर दिल्ली पोलीस आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने तपास सुरु केला आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की,संबंधीत व्यक्तीला मेडिकल एमरजन्सी होती.पोलिसांच्या माहितीनुसार, DMRC ने त्याला सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन केल्याने दंड ठोठावला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीसीपी मेट्रोद्वारा या प्रकरणाचा तपास सुरु आहे. रिपोर्टनुसार, ही घटना 15 मे 2026 रोजी रात्री 9:40 वाजताच्या सुमारास घडली होती.

नक्की वाचा >> KKR vs GT, IPL 2026 : इडन गार्डनवर फिन एलनचा धमाका, 'या' मेगा रेकॉर्डला गवसणी, अभिषेक-वैभवपुढे तगडं आव्हान

तो व्हिडीओ झाला व्हायरल

दिल्ली पोलिसांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय,"व्हायरल व्हिडीओत दिसणारा वृद्ध व्यक्ती जामिया मेट्रो स्टेशनपासून फरीदाबाद मेट्रो स्टेशनकडे प्रवास करत होता. कालकाजी मेट्रो स्टेशनवर इंटरचेंज दरम्यान त्याला मेडिकल एमरजन्सीचा सामना करावा लागला.त्याने जवळपास शौचालय शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याल ते सापडलं नाही.जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तेव्हा त्याला लिफ्टमध्ये एका बाटलीत लघवी करावी लागली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com