Electricity Bill: 'या' मीटरमुळे मिळणार वीज बिलात 10 टक्के सवलत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Electricity Bill:राज्यात प्रथमच विजेचे दर कमी होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


अभिषेक अवस्थी, प्रतिनिधी 

Electricity Bill:  राज्यात स्मार्ट पोस्टपेड वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 27,826 फिडर मीटर आणि 38 लाख ग्राहक मीटर बसवण्यात आले आहेत.  या ग्राहकांना सौर ऊर्जेच्या तासांदरम्यान वीज बिलात 10 टक्के सवलत दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, राज्यात प्रथमच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषद सदस्य  सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना मांडली. या संदर्भात झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेतील चर्चेत सदस्य अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

(नक्की वाचा : Devendra Fadnavis: '4 बोटं तुमच्याकडं', शिक्षकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर मोठा आरोप )
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशातील जवळपास सर्व राज्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवत आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 29 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, त्यापैकी चार वेगवेगळ्या कंपन्यांना काम देण्यात आले आहे. आपल्या राज्यातील विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवणे अनिवार्य नाही आणि या मीटरमध्ये प्रत्येक युनिटची गणना स्वयंचलित असल्याने, वीज बिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोळीवाडे आणि वन जमिनीवरील ग्राहकांना वीज पुरवठा करण्याच्या योजनेबाबत सर्व संबंधित विभागांची एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल आणि ती न्यायालयासमोर सादर केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Advertisement
Topics mentioned in this article