अमजद खान
पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. डोंबिवलीत उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. डोंबिवलीत काही तरुण-तरुणी दारू पीत असताना आढळून आल्याने एका बारवर कारवाई करण्यात आली आहे. तर तीन बार आणि रेस्टॉरंटवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जे बार नियम पाळणार नाहीत अशांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल असे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात अल्पवयीन मुलाकडून दारू पिऊन झालेल्या अपघातानंतर सर्वच जण हादरू गेल आहे. ज्या पबमध्ये अल्पवयीन तरुणाने दारू घेतली होती त्या पबवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सगळीकडे कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. डोंबिवलीतील उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केल्याचे आता समोर आले आहे. 25 तारखेपासून डोंबिवलीतल्या आतापर्यंत 4 बार अँड रेस्टॉरंट यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या चारही बार रेस्टॉरंटला सील ठोकण्यात आले आहे अशी माहिती डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी किरण सिंग पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - मतांचा टक्का वाढला, उत्तर पश्चिमचे मतदार कोणाचं गणित बिघडवणार?
कल्याण शेळ मार्गावर अनेक बार आहेत. त्या पैकी इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड , गिरीश रेस्टॉरंट अँड बार, मयूर रेस्टॉरंट अँड बार आणि साई सिद्धी या चार बारवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड या बारमध्ये वेळ संपल्यानंतरही लेडीज सर्विस सुरू होती. त्यामुळे या बारवर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - अटीतटीची लढत! ईशान्य मुंबई लोकसभेत बाजी कोणाची?
तर गिरीश गिरीश रेस्टॉरंट अँड बारमध्ये 25 वर्षाखालील तरुण-तरुणी दारू घेत होते. त्यामुळे याबारला कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मयूर आणि साई सिद्धी बार रेस्टॉरंट या बार मालकांनी त्यांच्या आयडीचे नूतनीकरण केले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे ही नियम तोडणाऱ्यां विरोधात उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.