Kolhapur News : कलाकारांचं वैभव गेलं! केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात 

केशवराव भोसले नाटगृहाला लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं आहे. नाटगृहाची प्रेक्षक गॅलरी खाली कोसळली. आजूबाजूला असलेले लाकडी जीना, आणि इतर साहित्य जळालं. आतमधील सर्व खुर्च्या, इलेक्ट्रिक वस्तू देखील जाळून खाक झाल्या.

Advertisement
Read Time: 3 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तब्बल अडीच तासानंतर ही आग आटोक्यात आली. घटनास्थळी जिल्ह्यातील सर्व अग्निशमन पथकांना पाचरण करण्यात आल होतं.

घटस्थळी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनाऊच्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहातील जनरेटरजवळ भीषण आग लागली. ही आग हळूहळू वाढत गेली. नाटगृहाच्या मागील बाजूस ही आग लागली. आग लागल्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच एक पथक दाखल झालं. आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं आणखी अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त मंजुलक्ष्मी यासह अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जिल्ह्यातील सर्व अग्निशमन पथक घटनास्थळी

आगीने जोर धरल्यामुळे 8 अग्निशमन दलाच पथक कमी पडू लागलं. यामुळे एअर फोर्सच विशेष अग्निशमन पथक बोलावण्यात आलं. या विशेष पथकाच्या वाहनाला नाटगृहाच्या गेटमधून आत येण्यास अडथळा निर्माण झाला होता. आग वाढतच गेल्याने गेट बाहेरूनच या विशेष अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखी पाण्याचे टँकर बोलावण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ठिकाणावरून अग्निशमन पथक बोलावण्यात आली होती. शेवटी 12 वाजताच्या सुमारास आग कमी झाली. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास यश आलं. 

(नक्की वाचा- पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकष शिथिल, कुणाला मिळणार मदत?)

सुदैवाने जीवितहानी नाही

केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमितची बैठक रात्री 7.30 वाजता संपली. मीटिंगला आलेले सर्वजण 8 ते 8.30 पर्यंत बाहेर गेले. 9.30 च्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने नाट्यग्रहत कोणीही नव्हतं, कोणता कार्यक्रम देखील नव्हता. त्यामुळे जीवितहानी टळली.

Advertisement

नाटगृहाचं मोठं नुकसान

केशवराव भोसले नाटगृहाला लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं आहे. नाटगृहाची प्रेक्षक गॅलरी खाली कोसळली. आजूबाजूला असलेले लाकडी जीना, आणि इतर साहित्य जळालं. आतमधील सर्व खुर्च्या, इलेक्ट्रिक वस्तू देखील जाळून खाक झाल्या. नाटगृहाच्या मागील बाजूस असलेल्या खासबाग मैदान येथील व्यासपीठावर छत कोसळलं. रात्रभर याठिकाणी आगीचा विस्तव होता. नाटगृहाच्या मुख्य व्यासपीठाच पूर्ण नुकसान झालं आहे.

Advertisement

(नक्की वाचा - बांगलादेशमध्ये सत्तांतर, नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांनी स्थापन केले हंगामी सरकार)

शेजारच्या खाऊंगाल्लीतून आरडाओरड

आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. शेजारी असलेल्या खाऊ गल्लीमधील विक्रेत्यांनी, तरुणांनी आरडाओरड सुरु केली. मुख्य रस्त्यांवर असलेल्या नागरिकांनी आग दिसताच केशवराव भोसले नाट्यग्राहकडं धाव घेतली. आग मोठी असल्याचे पाहून शेजारील खाऊ गल्लीतील विक्रेत्यांनी गॅस सिलेंडर हलवले. सगळी दुकान बंद केली.  

कलाकारांची नाट्यग्राहकडे धाव  

देवल क्लबजवळ बसलेल्या कलाकारांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, थोड्या वेळापूर्वीच नाटगृहाजवळून आम्ही आलो होतो. पुढे आल्यानंतर थोड्या वेळानं अचानक आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही पळत गेलो. परिस्थिती पाहून अंगावर काटा आला. अनेक कलाकारांना अश्रू देखील अनावर झाले. कलाकारांच वैभव गेलं अशा प्रतिक्रिया देखील आल्या.

Advertisement

घटनास्थळी स्थानिकांना मोठा स्फ़ोट ऐकू आला

केशवराव भोसले नाटगृहाच्या बाजूला असलेल्या मुख्य मार्गावर काही तरुणांनी ही आग पाहून घटनास्थळाकडे धाव घेतली. यातील अनेकांनी अग्निशमन दलाला मदत केली. प्रत्यक्षदर्शींनी  दिलेल्या माहितीनुसार नाटगृहाच्या मागच्या बाजूस त्यांना आग दिसली. एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज देखील त्यांना आला. केशवराव भोसले नाट्यग्रहाला लागलेली आग ही कोल्हापूरकरांसाठी काळा दिवस ठरली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली होती. आग आटोक्यात आल्यानंतर 12 नंतर हळूहळू गर्दी हटायला सुरुवात झाली. मात्र संपूर्ण घटनेत मोठं नुकसान झालं आहे.

Topics mentioned in this article