Crime News: अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर

Ambarnath Crime News: निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये सभा असल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ambarnath Crime News: अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अगदी दोन दिवसांवर आली असताना, अंबरनाथ पश्चिम भागातील नवीन भेंडी पाडा परिसरातून एक गंभीर आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

नेमकी घटना काय?

रात्री 1 वाजता पवन वाळेकर हे आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बसले होते. त्याच वेळी दुचाकीवरून दोन अज्ञात इसम कार्यालयाच्या दिशेने आले. या हल्लेखोरांनी कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर केले. हे गोळीबार कार्यालयाच्या काचेवर लागले. गोळीबारानंतर हे हल्लेखोर लगेच घटनास्थळावरून पळून गेले. ही संपूर्ण गोळीबाराची घटना कार्यालयाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

(नक्की वाचा- Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)

निवडणुकीला गालबोट

निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये सभा असल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या गोळीबारामागे उमेदवाराला धमकावण्याचा आणि निवडणुकीत दहशत माजवण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांचे प्राथमिक म्हणणे आहे.

या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबरनाथ पोलीस आणि बदलापूर पोलीस पथकासह गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडून शहरात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून आणि नागरिकांकडून होत आहे.

Advertisement

Topics mentioned in this article