गटारी पार्टी जीवावर बेतली; 5 मित्र गाडीसह नदीत बुडाले, एकाचा मृत्यू तर एकजण बेपत्ता

तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु झाला. पाणीपातळी वाढल्याने पाचजण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. 

Advertisement
Read Time: 1 min

मनोज सातवी, पालघर

निसर्गाच्या सानिध्यात पार्टी करण्यासाठी जाणे काही मित्रांच्या जीवावर बेतलं आहे.  तानसा धरणाच्या खाली पाच जण पार्टीसाठी गेले होते. तिथे पाचजण गाडीसह तानसा नदीत वाहून गेले. दरम्यान तीन जणांनी बाहेर उड्या मारल्याने ते बचावले, मात्र दोन जण गाडी अडकले होते. यापैकी एकाचे मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. मात्र एकजण आद्यप ही बेपत्ता आहे.

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण आले होते. दुपारी पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली गाडीत बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु झाला. पाणीपातळी वाढल्याने पाचजण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. 

पाच पैकी तिघांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या बाहेर उड्या मारल्याने बचावले. मात्र दोन जण गाडीत अडकले होते. यापैकीत गणपत शेलकंदे याचा गाडीतच पाणी आल्याने गुदमरून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. मात्र एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.

Topics mentioned in this article