Pune News: भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, जलमय परिसरातही 'हर हर महादेव'चा जयघोष, Video व्हायरल

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी थेट मंदिर परिसरात शिरल्याने मंदिराला अक्षरशः वेढा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bhimashankar Temple Flood Video

अविनाश पवार, प्रतिनिधी

Bhimashankar Temple Water Logging :  राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक प्रभाव घाटमाथ्यावरील भागांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी थेट मंदिर परिसरात शिरल्याने मंदिराला अक्षरशः वेढा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहत आलेले पाणी मंदिर परिसरात शिरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर अभयारण्य परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे परिसरातील ओढे, नाले आणि नैसर्गिक पाण्याचे प्रवाह दुथडी भरून वाहत आहेत.मंदिर परिसर तुलनेने खोलगट भागात असल्याने जंगलातील डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी पायरीमार्ग आणि इतर नैसर्गिक प्रवाहांमधून थेट मंदिराकडे येत असल्याचे दिसून आले.परिणामी मंदिराभोवती पाण्याचा वेढा निर्माण झाला.

Advertisement

मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू

मुसळधार पावसामुळे मंदिर परिसर पूर्णपणे जलमय झाला होता.जणू वर्षादेवताच भगवान शंकराच्या दर्शनासाठी अवतरल्याचा भास निर्माण करणारे हे दृश्य अनेक भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले.भर पावसातही भाविकांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही."हर हर महादेव"च्या जयघोषात अनेक भाविकांनी सुरक्षित अंतर राखत दर्शन घेतले.

नक्की वाचा >> महाराष्ट्रात या ठिकाणी रंगला पहिला भव्य अश्व रिंगण सोहळा, वारकऱ्यांनी जपलीय 31 वर्षांपासूनची ऐतिहासिक परंपरा

इथे पाहा पुराच्या पाण्याचा थरारक व्हिडीओ

दरम्यान,मंदिर परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत.मागील पाच महिन्यांपासून या कामांमुळे भाविकांसाठी दर्शन व्यवस्था मर्यादित करण्यात आली होती.काही दिवसांपूर्वीच दर्शनासाठी पुन्हा प्रवेश सुरू करण्यात आला असताना आता अतिवृष्टीमुळे सुरू असलेल्या विकासकामांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> Palghar News: पालघरच्या केळवा धरणाला भगदाड, 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 'त्या' 65 कुटुंबांचं काय?

मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.सध्या भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही दिवस परिस्थितीवर प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे.

Advertisement