मद्यसक्त व्यक्तींना मद्यमुक्त होण्यासाठी विनामूल्य मदत करणारी अल्कोहोलीक्स अनोनिमस (ए. ए.) ही विश्वव्यापी संस्था आहे. ही संस्था 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात (ओ.पी.डी.) मोफत जनजागरण स्टॉल लावणार आहे. या स्टॉलच्या माध्यमातून नशामुक्तीचे सल्ले दिले जातील. शिवाय जनजागृतीही केली जाणार आहे. पुण्यात याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील ससून हॉस्पिटल, कमला नेहरु हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल (चिंचवड), औंध हॉस्पिटल, येरवडा मेंटल हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, आंबेडकर हॉस्पिटल (खडकी), प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, राजीव गांधी रुग्णालय यांसह जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इतर शासकीय व खाजगी रुग्णालयांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या जनजागरण स्टॉलवर मद्यपीडित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत मार्गदर्शन, समुपदेशन तसेच अल्कोहोलीक्स अनोनिमस (ए. ए.) संदर्भातील माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येईल.मोफत मद्यमुक्तीची मदत व माहिती मिळविण्यासाठी 9765357757 किंवा 9049457757 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहयोगी प्राध्यापक, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी केले आहे.