Ganpati Visarjan 2025 Photos: ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत भाविकांनी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. मुंबई शहरातील गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी तसेच बाप्पाला निरोप देण्यासाठी लोकांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसानेही हजेरी लावली.
Photo Credit: PTI
लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, बाल गणेश मंडळाचा बल्लाळेश्वर, गणेश गल्ली मुंबईचा राजा, काळाचौकीचा महागणपती यासह लालबाग परिसरातील प्रसिद्ध गणपतींची मिरवणूक दुपारी 1 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आली.
Photo Credit: PTI
पुण्यातही मानाच्या गणपतींचे विसर्जन जल्लोषात पार पडले. मुंबई शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी 21 हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-जवान तैनात होते.
Photo Credit: PTI
संपूर्ण शहरावर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांचे लक्ष होते. याशिवाय 50 पेक्षा जास्त ड्रोन शहरातील विविध विसर्जन स्थळांवरील गर्दीवर लक्ष ठेवून होते.
Photo Credit: PTI
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गिरगाव चौपाटी येथे आयोजित विसर्जन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला.
Photo Credit: PTI
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव मुंबईत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला.
Photo Credit: PTI
ढोल-ताशांच्या गजरात, 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात चौपाटीवरील वातावरण भारावून गेले होते.
(नक्की वाचा: Ganpati Visarjan 2025 Wishes In Marathi: निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी! गणपती विसर्जनाचे भावुक मेसेज)
Photo Credit: PTI
यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा झाला.
Photo Credit: PTI
लोकांनी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला. विसर्जनावेळी मनात थोडी खंत आणि दु:ख असते, पण त्याचवेळी बाप्पा पुढील वर्षी पुन्हा येणार या आनंदाने प्रत्येकाचे मन भरून जाते: CM फडणवीस
Photo Credit: PTI
मुंबई, पुणे आणि राज्यातील सर्व शहरांमध्ये तसेच गावांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शिस्तीत आणि शांततेत पार पडल्या: CM फडणवीस
Photo Credit: PTI
या यशस्वी व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेली तयारी अत्यंत कौतुकास्पद आहे.
Photo Credit: PTI
गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि स्वयंसेवकांनी एकत्रितपणे केलेल्या व्यवस्थेमुळे हा सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडला.
Photo Credit: PTI
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक
Photo Credit: PTI
Photo Credit: PTI
गणेश विसर्जनासाठी (Ganpati Visarjan 2025) मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीमुळे नागरिकांना आणि गणेश मंडळांना कुठेही अडचण आल्याची तक्रार आली नाही. मुंबई महापालिकेने केलेले अडीचशेहून अधिक कृत्रिम तलावामुळे घरगुती गणेशाच्या विसर्जनाची (Ganesh Visarjan 2025) चांगली सोय झाली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई पोलीस बजावत असलेल्या कर्तव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि सर्व अधिकारी कर्मचारी तसेच मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
Photo Credit: PTI
मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव विसर्जनासाठी केलेली तयारी अभिनंदनीय असल्याचे सांगत विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यांवर गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षेची काळजी तसेच नागरिकांना दिलेल्या सुविधा यामुळे हा उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुखकर झाल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
Photo Credit: PTI
Photo Credit: PTI
मुंबई महापालिकेने विसर्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 275 हून अधिक कृत्रिम तलाव केले आहेत.
Photo Credit: PTI
गणपती बाप्पावर गुलालाची उधळण
Photo Credit: PTI
Photo Credit: PTI
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
Photo Credit: NDTV Marathi