Ganpati Visarjan 2025 Wishes And Quotes In Marathi: गणेश चतुर्थीपासून दहा दिवस भाविकांनी लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केली. आता बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत भक्तगण नाचतगाजत, भक्तिभावात गणरायाचे विसर्जन करत आहेत. गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त खास भक्तिमय आणि भावुक मेसेज...
गणपती विसर्जनाचे भावुक मेसेज| गणेश विसर्जनाचे भक्तिमय मेसेज| Ganpati Visarjan 2025 Wishes In Marathi| Ganesh Visarjan 2025 Wishes
1. गणराजा तू येतोस घरी
साजरा होतो आनंद दरवर्षी
पण विसर्जनाच्या क्षणी डोळे आसवांनी भरती
लवकर परत येशील हीच वाट पाहती
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
2. दहा दिवस दाही दिशा आनंद पसरला
प्रत्येक क्षण तुझ्यामुळे खास वाटला
आज मात्र मन सुन्न झालंय रे बाप्पा
लवकर ये पुन्हा, हीच प्रार्थना!
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
3. बाप्पा तुझे रूप सुंदर
तुझ्यामुळे घरात आला आनंदाचा सागर
आज जरी जातोयस दूर
तरी हृदयात तुझी कायम असणार आहे जागा
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
4. मिरवणुकीत वाजले ढोल-ताशांचे टाळ
पण मन भरून आले रे बाप्पा
विसर्जनाच्या क्षणामुळे नेहमीच पाणावतात डोळे
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
5. तुझे येणे म्हणजे सण साजरा होणे
तुझे जाणे काळजात हुरहूर वाढणे
डोळ्यात पाणी, ओठांवर स्मित
बाप्पा, लवकर परत येशील नक्की!
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
6. मोदक दिलेस
आशीर्वादही भरभरून दिले
आता जातोयस
आम्ही राहू वाट पाहत पुन्हा
येशील तू, हेच आश्वासन दे बाप्पा!
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
7. विसर्जनात नाही दुःख, आहे प्रीती
कारण तुझ्या आठवणींनी भरले मन
गणराजा ये तू लवकर
तुझे स्वागत करायला सज्ज आहे घर
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
8. बाप्पा, तुझ्यामुळे जीवन रंगांनी भरले
दहा दिवस स्वर्गासारखे वाटले
आज तू जात आहेस, तुझ्या घरी
तरी आमच्या मनात तुझी श्रद्धा कायम राहील
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!

Photo Credit: Canva
9. धूप, दीप, नेवेद्य सारे झाले तुझ्यासाठी
माघारी जाताना बांधल्या जातात आठवणींच्या गाठी
बाप्पा, लवकर परत ये
घर दरवर्षी तुझ्यासाठी कायम सज्ज असेल!
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
10. मिरवणुकीत नाचलो, ढोलताशांच्या गजरात भान हरपले
तुझ्या विसर्जनाच्या क्षणी हृदय थांबले
पुन्हा येशील याच आशेवर
राहतो आम्ही तुझ्या स्वागतासाठी सज्ज
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
11. बाप्पा तू घरी आल्यावर दिलंस सुखसमाधान
आता जाताना देऊन जातोयस आठवणी
तुझी वाट पाहू दिवसरात्र
लवकर ये, हेच साऱ्यांचे मागणे
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
12. मोदक, आरती, फुलांचा गंध
तुझ्या रूपाने घरात आला आनंद
आज जरी परतीचा दिवस आला
तरीही तु कायम मनात राहशील बाप्पा
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
13. विसर्जन म्हणजे शेवट नव्हे
ही तर नव्या सुरुवातीची साद आहे
बाप्पा लवकर परत ये
हीच भक्तांची साद आहे
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!

Photo Credit: Canva
14. तुजसम प्रेम कोण देईल बाप्पा
साऱ्या दु:खांवर तूच आहेस उपाय गणराया
तू जातोस तरी राहशील मनाजवळ
म्हणूनच विसर्जनावेळीही डोळे आले भरुन
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
15. मोदकाचा सुगंध राहील घरात
आरतीच्या ओव्या आठवतील मनात
जरी विसर्जन झाले आज
पण बाप्पा, तू आमच्यासोबत सदैव राहशील!
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world