Trending News: मराठमोळ्या GenZ IPS अधिकाऱ्याचा जलवा! गँगस्टरना वेसण घालण्यासाठी लढवलीय भन्नाट शक्कल

या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्यांनी 21 विविध यंत्रणांचा डेटा एकत्र आणून गुन्हेगारांचा शोध घेतला आहे. त्यात त्यांना मोठं यश ही आलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Gen Z IPS Abhijeet Patil: दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनांनंतर 'Gen Z' (जनरेशन झेड) हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर आता एका 'Gen Z' आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे हा 'Gen Z' आयपीएस अधिकारी  मराठमोळा आहे. त्यांचे नाव अभिजीत पाटील असं आहे. ते राजस्थान कॅडरचे 'Gen Z' आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांच्या आधुनिक कार्यशैलीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे. अभिजीत पाटील हे राजस्थान पोलिसांमधील सर्वात तरुण IPS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. सध्या ते चूरू जिल्ह्यात 'एंटी-गैंगस्टर टास्क फोर्स' (AGTF) चे प्रमुख आहे.  तर  राजगड येथे एएसपी (ASP) म्हणून कार्यरत आहेत.

अभिजीत पाटील यांचा जन्म 11 जून 1999 रोजी महाराष्ट्रातील ठाणे येथे झाला आहे. ते मुळचे मुंबईकर आहेत.  त्यांच्या आई पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. तर त्यांचे  वडील बृहन्मुंबई महानगरपालिकेतून (BMC) सेवानिवृत्त झाले आहेत. पाटील यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पास केली होती. त्यांचा ऑल इंडिया 470 वी रँक मिळवली होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे 22 वर्ष होते. त्या वयात के IPS अधिकारी झाले होते. मात्र त्यांचे वय जरी लहान असले तरी त्यांचे कर्तुत्व मोठे होते. त्यांच्यावर जी जी जबाबदारी आली ती त्यांनी यशस्वी पण पार पाडली आहे.   

Advertisement

नक्की वाचा - Success Story: 14 वेळा अपयश, तरी ही डगमगली नाही, 15 व्या प्रयत्नात देशात 23 वी आली

लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गोदारा गँगचा राजगड हा अभेद्द किल्ला समजला जातो. या भागात या गँगची दहशत आहे. पण या  भागात गेल्या वर्षभरात त्यांनी एकही गँगवार किंवा हत्येची घटना घडू दिली नाही. स्वत: अभिजीत पाटील यांनी असा दावा  केला आहे. राजस्थान पोलिसांमध्ये NATGRID (नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड) सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर करण्यात ते अग्रेसर आहेत. या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्यांनी 21 विविध यंत्रणांचा डेटा एकत्र आणून गुन्हेगारांचा शोध घेतला आहे. त्यात त्यांना मोठं यश ही आलं आहे. 

नक्की वाचा - Success Story : 9 महिने नोकरी नाही, मग तरुणाने CV मध्ये बदलल्या 4 गोष्टी; थेट 50 लाख पॅकेजचा मिळाला जॉब 

तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अनेक केसचा गुंता सोडवला आहे. अशाच पद्धतीने डिसेंबर 2025 मध्ये अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या गाडीचा कोणताही ठोस नंबर नव्हता. NATGRID च्या मदतीने त्यांनी हजारो वाहनांमधून केवळ 15 संशयित वाहने शॉर्टलिस्ट केली. त्यानंतर छापा मारून मोठी कारवाई केली. या यशस्वी कारवाईची राजस्थान पोलीस मुख्यालयाने 'केस स्टडी' म्हणूनही दखल घेतली आहे. या कारवाईत मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांचे आणि अभिजीत पाटील यांचे हे मोठे यश होते. या कारवाईनंतर तर पाटील यांची चर्चा संपूर्ण राजस्थान मध्ये होत होती.