जाहिरात

Success Story : 9 महिने नोकरी नाही, मग तरुणाने CV मध्ये बदलल्या 4 गोष्टी; थेट 50 लाख पॅकेजचा मिळाला जॉब 

तुम्ही फ्रेशर असाल किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला जॉब मार्केटमधील लहान-सहान गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

Success Story : 9 महिने नोकरी नाही, मग तरुणाने CV मध्ये बदलल्या 4 गोष्टी; थेट 50 लाख पॅकेजचा मिळाला जॉब 

Success Story : तुम्ही फ्रेशर असाल किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला जॉब मार्केटमधील लहान-सहान गोष्टी समजून घ्यायला हव्यात. एका तरुण सॉफ्टवेयर डेव्हलपरने असंच काहीसं केलं. तब्बल ९ महिने त्याने अनेक कंपन्यांच्या पायऱ्या झिजवल्या, मात्र त्याला नोकरी मिळाली नाही. मात्र तरीही त्याने हार मानली नाही. आपल्या रेज्युमेमध्ये चार गोष्टी बदलल्या आणि थेट ५० लाख पॅकेजची नोकरी मिळवली. 

अनेक महिने कंपन्यांकडून नकार, शेवटी असं बदललं नशीब

दिल्लीतील टॉप इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटर सायन्समध्ये पदवी पूर्ण केलेल्या या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर आपला प्रवास शेयर केला आहे. यानुसार, त्याने २०२३ मध्ये बॅचलर डिग्री घेतली होती. यानंतर इंटर्नशिप केली आणि त्यानंतर एका प्री-प्लेसमेंटच्या माध्यमातून पहिली नोकरी मिळवली. मात्र येथे पगार कमी होता आणि शिकायला फार संधी नव्हती. यासाठी त्याने नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला. 

तब्बल ९ महिने अनेक कंपनीत अप्लाय केल्यानंतरही काहीच फायदा झाला नाही. यादरम्यान त्याने आपल्या रेज्युमेमध्ये चार गोष्टी बदलल्या, ज्यामुळे त्याला वर्षाला ५० लाख पॅकजची नोकरी ऑफर झाली. 

नक्की वाचा - Success Story : 38 हजारांच्या नोकरीला मारली लाथ; 2 लाखांची गुंतवणूक आता दरमाह एक लाखाची कमाई

प्रत्येक जॉबसाठी वेगवेगळा रेज्यूमे...

एकच रेज्यूमे प्रत्येक कंपनीत पाठवण्याची चूक करू नका. कंपनीचा जॉब डिस्क्रिप्शन लक्षात घेऊन ते समजून घ्या आणि त्यानुसार रेज्यूमे तयार करा. पदाच्या गरजेनुसार, स्क्रिल्स एडजस्ट करा. 

रेज्यूमेचा फॉर्मेट बदलला...

रेज्यूमे साधा-सोपा असूद्यात. यासाठी फॉन्टकडे लक्ष द्या. सहज वाचता यायला हवं. सोबतच रेज्यूमेच्या शेवटी एक लहान मात्र परिणामकारक सारांश जोडला. याचा उपयोग मुलाखतीदरम्यान होतो. कारण मुलाखत घेणाऱ्याला उमेदवाराचा व्यावसायिक प्रवास माहिती असतो. 

प्रोफेशनली कंटेंट लिहिला...

रेज्यूमेममध्ये भाषा अत्यंत महत्त्वाची असते. तरुणाने अत्यंत प्रोफेशनल भाषेत रेज्यूमे तयार केला. ज्यामध्ये गुण कौशल्य, कामाचा अनुभव आणि यशाबाबत व्यवस्थितपणे लिहिण्यात आलं. केवळ काम सांगण्यापेक्षा त्या कामाचे रिझल्ट अधोरेखित करा. कंटेट प्रोफेशनल पद्धतीने लिहिण्यासाठी Chatgpt सारख्या AI टूलची मदत घेतली. 

कौशल्यांवर काम करून रेज्यूमेत केली सुधारणा...

वारंवार मिळणाऱ्या नकारामुळे तरुणाने हार मानली नाही आणि आपल्या कौशल्यांवर काम केलं. डेव्हलपरने डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदमसारख्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं. 

LeetCode च्या टॉप ७५ आणि NeatCodeच्या १५० प्रश्नांचा सराव केला. अवघड पॅटर्न्सच्या नोंदी केल्या आणि React व React Native पासून Node.js, Express, तसेच मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स  कौशल्यांपर्यंत सर्व काही शिकण्यावर लक्ष केंद्रित केलं. यामुळे माझा रेज्यूमे पूर्वीपेक्षाही अधिक चांगला झाला.

मुलाखतीसाठी बोलावणं येऊ लागलं...

रेज्यूमेममध्ये या लहान-सहान बदलांनंतर मुलाखतीसाठी फोन येऊ लागले. पहिल्यांदा जिथं रेज्यूमे पाठविल्यानंतरही उत्तर येत नव्हतं, आता कंपन्या रिप्लाय करू लागल्या आणि मुलाखतीसाठी बोलावू लागले. 

यावरुन लक्षात आलं की, रेज्यूमे केवळ माहितीसाठी नाही तर पर्सनल ब्रँडिंगचंही माध्यम आहे. सॉफ्टवेयर डेव्हलपर तरुणाला अमेरिकेच्या यूनिकॉर्न स्टार्टअपमधून कॉल आला. तरुणाने मुलाखतीचे दोन राऊंड क्लियर केले आणि ५० लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळवली.  


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com