घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आयुक्त कैसर खालिद निलंबित, गृह विभागाची मोठी कारवाई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गृह विभागाने मोठी कारवाई केली आहे. गृह विभागाने तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांचे निलंबन केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गृह विभागाने मोठी कारवाई केली आहे. गृह विभागाने तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांचे निलंबन केलं आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर तपासात होर्डिंगला परवानगी देताना गैरप्रकार आणि निष्काळजीपणा झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल पोलीस महासंचालकांनी राज्य सरकारला सोपवला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप नेते किरीट सोमय्या या कारवाईचं स्वागत केलं आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांना निलंबित केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करतो. खालिद यांचा भ्रष्ट कारभारामुळे घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटना झाली.  

(नक्की वाचा- जामीन मिळाला तरीही दोषीवर कारवाई करणारच, मुख्यमंत्र्यांनी पुणे अपघातातील पालकांना केलं आश्वस्त)

त्या संध्याकाळी नेमके काय घडले?

मुंबईत 13 मे रोजी हवामानामध्ये अचानक बदल झाला होता. वादळीवारे आणि जोरदार पावसामुळे घाटकोपरमध्ये अजस्त्र होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर 70 हून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर हे होर्डिंग अनधिकृत असल्याची बाब समोर आली होती.

(नक्की वाचा- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर)

दरम्यान या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.यामध्ये सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या कंपनीने हे होर्डिंग लावले होते त्याचा मालक भावेश भिंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त करण्यात आली असून त्यानुसार तपास केला जात असल्याची माहिती आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article