जाहिरात
Story ProgressBack

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pune Porsche Car Accident : मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. मुलाचे आई-वडील आणि आजोबा हे देखील तुरुंगात आहेत. 

Read Time: 2 mins
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिली आहेत. मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. मुलाचे आई-वडील आणि आजोबा हे देखील तुरुंगात आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वकिलांना याबाबत म्हटलं की, उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे आदेश दिले आहेत. बालसुद्धारगृहातून त्याची सुटका केली  जाणार आहे. आरोपी मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे दिली जाणार आहे. अल्पवयीन आरोपीचे आता काऊन्सिलिंग केलं जाणार आहे. 

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे, असंही उच्च न्यायालयाने म्हटलंय. मुलाची तत्काळ बालसुधारगृहाच्या कस्टडीतून सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुलाची आत्या पूजा जैनने हेबियस कॉर्पसअंतर्गत याचिक दाखल केली होती. 

(नक्की वाचा - पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण, पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड )

काय आहे प्रकरण? 

पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. कार चालवणारा अल्पवयीन होता. रात्रभर पबमध्ये बसून दारु प्यायल्यानंतर कार अनियंत्रित होऊन हा अपघात झाला होता. या प्रकरणात त्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक करण्यात आली होती. विशाल अग्रवाल यांनी विविध कट रचत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासात याप्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा देखील याता हात असल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे.

(नक्की वाचा: पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM शिंदेंचे मोठे पाऊल, पोलीस आयुक्तांना दिले हे निर्देश)

अग्रवाल कुटुंबातील 4 जण तुरुंगात

कार दुर्घटनेनंतर पुणे प्रकरणी वेगाने कारवाई करत यामध्ये ज्या कुणाचा सहभाग होता त्या सर्वांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना अल्पवयीन मुलगा, त्याचे आई-वडील, आजोबा यांना देखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या 3 कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
मेथीच्या दुप्पट किमतीत एक कोथिंबीरीची जुडी; पालेभाज्यांच्या किमतीत वाढ
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Rehabilitated villages in state should be immediately taken over by Rural Development Department
Next Article
दरड, भूस्खलनामुळे गाडल्या गेलेल्या गावांबाबत सरकारचा मोठा निर्णय
;