योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola-Badnera Train Viral News : अकोला-बडनेरा पॅसेंजर ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात एका तरुणीने चक्क बांगड्याच घातल्या. इतकंच नव्हे तर ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत त्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. महिलांची छेड काढणाऱ्यांची धुलाई झाल्याचं अनेक व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल.पण या या ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीने अनोख्या पद्धतीत शिक्षा दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,'अकोला-बडनेरा'रेल्वेत छेड काढणाऱ्या छेड काढणाऱ्या रोमियोच्या तरुणीने भरवले हातात बांगड्या भरल्या.त्यानंतर या तरुणीने तरुणाच्या ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत त्याला धडा शिकवला.शेगाववरून बडनेराकडे येणाऱ्या 'भुसावळ-वर्धा पॅसेंजर मेमो'ट्रेनमध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीने आणि प्रवाशांनी मिळून अनोखी शिक्षा दिली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.
नक्की वाचा >> Akola News : अकोला महापालिकेतील 'या' 3 नगरसेवकांना केलं निलंबित! 'ते' प्रकरण उच्च न्यायालयात जाणार
नेमकं काय घडलं?
'भुसावळ-वर्धा पॅसेंजर मेमो'ट्रेनमध्ये प्रवास करत असताना एका तरुणाने तरुणीशी अश्लील वर्तन करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर तरुणीने न घाबरता त्याला जागेवरच धडा शिकवला आणि सर्वांसमोर चांगलंच झापलं.तरुणीचा आक्रमक पवित्रा पाहून डब्यातील इतर प्रवासीही तिच्या मदतीला धावून आले.तरुणीने तरुणाच्या हातात बांगड्या भरल्या आणि त्याच्या ओठांवर लिप्सिटकही लावली. या व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.