Gold rate: दुबईपेक्षा नागपुरात सोनं स्वस्त, काय आहे कारण? जाणून घ्या हिशेब

दुबईत सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेकिंग चार्जेस लावले जातात असं रोकडे यांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनंचे भाव रोज वाढताना दिसत आहेत. जवळपास 80 हजाराच्या घरात सोनं गेलं आहे. लवकरच ते एक लाखाच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा वेळी सोनं खरेदी करावं का? केलं तर कुठे खरेदी करावं यासारखे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यात काही जणांचा कल हा दुबईतून सोने खरेदी करण्यावर असतो. भारताच्या तुलनेत दुबईत स्वस्त सोनं मिळतं असा त्यांचा समज असतो. पण दुबई पेक्षा नागपूरात सोनं स्वस्त मिळत असेल तर?  तुम्हाला विश्वास पटणार नाही पण हे शक्य आहे. ऑल इंडिया जेम्स ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी हा दावा केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुबई पेक्षा नागपूरात सोनं स्वस्त मिळेल असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते आता शक्य आहे. नागपूरातच नाही तर भारतात कुठे ही दुबई पेक्षा स्वस्त सोनं मिळू शकतं असा दावाच ऑल इंडिया जेम्स ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष  राजेश रोकडे यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एक हिशेब मांडला आहे. देशाचा अर्थसंकल्प नुकताच मांडला गेला. त्यात कस्टम इंम्पोर्ट ड्युटीत 9 टक्के कपात करण्यात आली. पहिले ती 15 टक्के होती. त्यात 9 टक्के कपात केल्याने ती 6 टक्के झाली.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune News: 13 दिवसात घटस्फोट, पोटगी ही द्यावी लागली नाही, हे कसं शक्य झालं? ही बातमी नक्की वाचा

Advertisement

दुबईत सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेकिंग चार्जेस लावले जातात असं रोकडे यांनी सांगितलं. दुबईत सध्या 5 टक्के वॅट आहे. शिवाय मेकिंग चार्जेस हे 25 टक्के आहेत. विशेष म्हणजे सर्वात जास्त दागिने हे भारतात बनवले जातात. दुबईत 70 टक्के दागिने हे भारतातून जातात. दुबईत आणि भारतात बनवल्या जाणाऱ्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसमध्ये दुप्पटीचा फरक आहे असंही रोकडे यांनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb News: 'औरंगजेब क्रूर कसा?' कबरीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांचे काय आहे म्हणणे

भारताचा विचार केल्यास पाच टक्के इंम्पोर्ट ड्युटी, तीन टक्के जीएसटी, आणि 12 टक्के मेकिंग चार्जेस असे मिळून वीस टक्क्यांच्या वर खर्च जात नाही. तोच खर्च दुबईत मात्र 28 ते 30 टक्केच्या घरात जातो. तुलनेत दुबईत भारता पेक्षा महाग सोनं मिळतं असं ही रोकडे यांनी स्पष्ट केलं. ज्यावेळी  इंम्पोर्ट ड्युटी ही 15 टक्के होती त्यावेळी दुबईत सोनं खरेदी करणं फायद्याचं होतं. पण आता हीच  इंम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे ते भारतात खरेदी करणं कधी ही फायद्याचं आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे दुबई पेक्षा भारतात सोनं खरेदी करा असं ही त्यांनी सांगितलं.