टेक जगतात दरवर्षी उत्सुकता निर्माण करणाऱ्या 'गुगल ईयर इन सर्च 2025' अहवालाने जगभरातील इंटरनेट विश्वात मोठी चर्चा घडवून आणली आहे. या अहवालानुसार, रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंतच्या वेळेत महिलांनी विशेषतः 18 ते 35 वयोगटातील मुलींनी केलेल्या सर्च डेटा समोर आला आहे. यामुळे अनेक तज्ज्ञांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. रात्रीच्या या वेळात महिलांच्या सर्चची संख्या 40% ने वाढली आहे. बहुतांश ट्रेंड्स हे कसले आहेत. त्या नक्की रात्रीच्या वेळी काय सर्च करतात याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. त्यांच्या सर्च करण्याच्या गोष्टीपाहून तुम्ही ही आवाक झाल्या शिवाय राहाणार नाही.
रात्रीच्या वेळेतील टॉप ट्रेंड्स
हा डेटा महिलांच्या मनातील भावनिक आधार आणि आरोग्यासंबंधीच्या गरजा स्पष्टपणे दर्शवतो. 'गुगल ट्रेंड्स' नुसार रात्रीच्या वेळी सर्वाधिक सर्च झालेले 3 प्रमुख विषय आणि त्यांच्या वाढीचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.
AI बॉयफ्रेंड चॅट:
AI बॉयफ्रेंड चॅट या सर्चमध्ये 65% वाढ झाली आहे. एकटेपणा दूर करण्यासाठी आणि भावना व्यक्त करण्यासाठी मुली व्हर्च्युअल पार्टनर्सचा आधार घेत आहेत. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, 25% मुलींनी खरे संबंधांपेक्षा AI चॅटला प्राधान्य दिल्याचे आढळले आहे. ही गोष्ट सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. शिवाय ती तेवढीच धक्कादायक ही समजली जाते.
झोप न येण्यावर घरगुती उपाय:
'इन्सोम्निया' अर्थात निद्रानाशावर नैसर्गिक उपाय शोधण्यात 55% वाढ झाली आहे. ताणामुळे झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेक मुली घरगुती उपचार शोधत आहेत. परिणामी फार्मसी डिलिव्हरीच्या ऑर्डर्स दुप्पट झाल्या आहेत. बऱ्याच्या मुली शांत झोप कशामुळे येते या गोष्टी गुगलवर सर्च करत असताना दिसल्या आहेत.
स्किनकेअर रूटीन:
गुगल सर्चमध्ये ब्युटी ट्रेंडमध्ये 70% वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी 'मॅजिक ॲसिड' किंवा विशिष्ट उत्पादनं सर्च केली जात आहेत. त्वचेची काळजी कशी घेतली जावी. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे. त्याचे उपाय काय आहेत. त्यासाठी कोणती प्रोडक्ट वापरणे गरजेचे आहे या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे.
अन्य गुगल सर्च
याशिवाय, नाश्ता रेसिपीज, फॅशन हॅक्स, ज्योतिष, मेंटल हेल्थ चेक-अप आणि व्हायरल मिम्स हे विषयही रात्रीच्या सर्चमध्ये आघाडीवर राहिले. अशा पद्धतीच्या मजेशीर गोष्टीही मुली रात्रीच्या वेळी सर्च करतात. जोतिष पाहाणाऱ्या मुलींची ही संख्या त्यात जास्त आहे. हा अहवाल महिलांच्या बदललेल्या जीवनशैली आणि मानसिक आरोग्याच्या गरजांवर प्रकाश टाकतो असं म्हणायला काही हरकत नाही.