Weird Wedding rituals of India: भारतात विवाहा वेळी वेगवेगळ्या पद्धती आहे. काही पद्धती तर खूप आश्चर्यकारक तितक्याच विचित्र ही आहे. हिमाचल प्रदेशातल्या एका भागात तर सख्खे भाऊ एकाच मुलीसोबत लग्न करण्याची प्रथा आहे. त्याची ही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. आता आणखी एक प्रथा समोर आली आही. लग्नाची ही प्रथा थोडी वेगळी पण खेळीमेळीची आहे. या प्रथेच लग्न झाल्यानंतर नवऱ्याला सासरकडची मंडळी विहीरीत किंवा तलावात फेकून देतात. ही प्रथा थोडी वेगळी वाटेल. पण ही प्रथा आहे आणि आजही पाळली जाते. त्या मागे काही कारणं ही आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
ही वेगळी प्रथा गोव्यात अवलंबली जाते. गोवा राज्य केवळ त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच नव्हे, तर येथील विलक्षण सांस्कृतिक परंपरांसाठीही जगभर प्रसिद्ध आहे. यापैकीच एक खास परंपरा म्हणजे 'साओ जोआओ' (Sao Joao) उत्सव प्रथा. दरवर्षी उत्तर गोव्यात साजरा होणारा हा एक जल-आधारित धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. जो सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो. या उत्सवाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नवविवाहित नवरदेवाला त्याचे सासरवाडीचे लोक विहीरीत किंवा तळ्यात ढकलून देतात.
ही प्रथा वरवर पाहता विचित्र वाटू शकते, परंतु यामागे अनेक रंजक आणि सखोल प्रतीकात्मक अर्थ आहेत. नवरदेवाने पाण्यात डुबकी घेणे हे त्याच्या नवीन वैवाहिक जीवनात समृद्धी, चांगले पीक आणि कुटुंबात आनंद व भावी पिढ्यांचे आशीर्वाद घेऊन येण्याचे प्रतीक मानले जाते. हे नवीन नात्याच्या शुभ शुभारंभाचे द्योतक आहे म्हणून त्याला पाण्यात टाकले जाते. यात नवरदेवाची परीक्षा ही घेतली जाते. सासरच्या लोकांसाठी ही परंपरा एक संधी असते. यातून नवरदेवाचा स्वभाव, त्याची ऊर्जा, विनोदबुद्धी आणि नव्या कुटुंबात मिसळून जाण्याची त्याची क्षमता याची एकप्रकारे चाचणी घेतली जाते.
गोव्याच्या संस्कृतीत पाण्यात उडी मारणे हे 'स्वीकार' किंवा 'स्वागत' करण्याचे प्रतीक मानले जाते. या कृतीतून नवरदेव आपले नवीन कुटुंब आणि समाज खुलेपणाने स्वीकारत असल्याचे दर्शवतो. हा खास विधी उत्तर गोव्यातील अंजुना, असगाव, म्हापसा परिसरातील अनेक गावे आणि कालनगुटच्या आसपासच्या भागात मोठ्या उत्साहात पाळला जातो. नवरदेव पक्ष याला 'मजेचे स्वागत' मानतो. ज्यामुळे लग्नाचे वातावरण अधिक आनंदी बनते. हा उत्सव पाणी, निसर्ग, कुटुंब आणि समाज या घटकांना एकत्र आणणारी गोव्याची एक अमूल्य सांस्कृतिक ओळख आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world