हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, नक्की कारण काय?

पनवेल ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पुर्ण पणे ठप्प झाली होती. मात्र काही तासात हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना त्याचा फटका बसला. नेरूळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पनवेल ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पुर्ण पणे ठप्प झाली होती. मात्र काही तासात हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला होता. जवळपास एक तासा पेक्षा जास्त वेळ एकही लोकल या दरम्यान धावली नाही. यावेळी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी हायवे गाठून बसने कार्यालायत गाठले.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सकाळी सकाळी हार्बर मार्गावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. कार्यालय गाठण्यासाठी नोकरदार हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकावर पोहोचले. पण तिथे लोकलच नव्हती. रेल्वे कडून सुचना केली जात होती. पनवेल सीएसएमटी आणि सीएसएमटी अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल ह्या रद्द करण्यात आल्या आहेत. नेरूळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी पाच वाजल्यापासून एकही लोकल धावली नाही. त्यामुळे पनवेल नेरूळ दरम्यानच्या रेल्वे स्थानकात एकच गर्दी दिसून येत होती.  

ट्रेंडिंग बातमी - नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची

  त्यानंतर हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला. आता लोकल सेवा सुरू झाली आहे. मात्र लोकल जवळपास पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल सुरू झाल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत होती. सकाळी नवी मुंबई परिसरात जोरदार पाऊसही होत होता. त्यात लोकल बंद असल्यामुळे नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. कार्यालय गाठायचं असल्याने अनेकांनी बसने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे बस सेवेवरही सकाळी ताण पडल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान आता हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत झाली आहे.