जाहिरात

नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची

रात्री नागपूरात एका ऑडी कारने भरधाव वेगात तीन चार चाकी गाड्यांना धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीलाही धडक दिली.

नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची
नागपूर:

नागपूरात हिट अँण्ड रनचे प्रकरण घडलं आहे. मध्य रात्री नागपूरात एका ऑडी कारने भरधाव वेगात तीन चार चाकी गाड्यांना धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीलाही धडक दिली. त्यानंतर ही गाडी भरधाव वेगाने मानकापूर ब्रिज गेली. ही तिथेही एका गाडीला धडक देण्यात आली. त्यावेळी तिथे असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाडी चालवत असलेल्या मुलांना गाडी बाहेर काढले. त्यांना चोप दिला. नंतर पोलीसांच्या हवाली करण्यात आले. ही गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात झाल्यानंतर गाडीची नंबरप्लेट लपवण्यात आली होती. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या गाडीत दोघे जण होते अशी माहिती पुढे येत आहे. या दोघांनी धरमपेठ परिसरात मद्य प्राशन केलं. त्यानंतर ते भरधाव गाडी चालवत होते. त्यात त्यांनी अनेक गाड्यांना उडवलं. त्यानंतर ही ते थांबले नाहीत. गाड्यांना उडवत ते मानकापूर ब्रिजच्या दिशेने  गेले. तिथे त्यांना गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांना पकडलं. ही गाडी बावनकुळेंच्या मुलाच्या नावावर आहे. मात्र पोलीसांनी जे एफआयआर दाखल केले आहे त्यातून त्याचे नाव गायब आहे. त्यामुळे पोलीसांवर टिका केली जात आहे. विरोधकांनीही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

दरम्यान ही गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी सांगितले आहे. या अपघाताची पोलीसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो असे बानवकुळे म्हणाले आहेत. अपघात दुर्दैवी असल्याचे सांगत त्यात कुणाला इजा झालेली नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?

या प्रकरणी आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जी गाडी आणण्यात आली आहे. त्या गाडीची नंबर प्लेट गायब आहे. हा काय प्रकार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय का अशी विचारणाही त्यांनी केली आहे. शिवाय अपघात करणारे सर्वे नेत्याचीच मुलं कशी काय त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहीजे अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतूल लोंढे यांनी केली आहे.  

Switch To Dark/Light Mode
Previous Article
अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार की नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची
Harbour railway traffic delay Overhead wire malfunction Neru
Next Article
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, नक्की कारण काय?