गाडी चालवत असताना एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला. त्यामुळे त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि कारचा अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. अनिकेत नलावडे हे गाडी चालवत होते. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यावेळी त्यांना दवाखान्यात आणलं गेलं त्यावेळी त्यांचे हृदय बंद पडलं होतं. बीपी काऊंट होत नव्हता. जवळपास 15 मिनिटे त्यांचे ह्रदय बंद होते. अशा वेळी चमत्कार झाला अन् अनिकेत यांचा जीव वाचला. ते कसं शक्य झाले ते डॉक्टर विजय डिसूजा यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छातीत दुखत असल्याने अनिकेत यांनी आपल्या डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात येण्यासाठी सांगितलं. त्यानंतर ते आपल्या पत्नीसह डॉक्टरांकडे निघाले. त्यावेळी ते स्वत: गाडी चालवत होते. कळंबोली जवळ येताच त्यांना हार्ट अटॅक आला. त्यात ते बेशुद्ध झाले. नंतर त्यांच्या कारचा अपघात ही झाला. त्यात एकचा मृत्यू झाला तर काही जण जखमी ही झाले. पण अनिकेत हे बेशुद्ध पडले होते. त्याच अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर विजय डिसूजा यांनी त्यांची तपासणी केली.
ज्यावेळी अनिकेत यांना रुग्णालयात आणलं गेलं. त्यावेळी त्यांची ह्रदय बंद होते. बीपी काऊंट मिळत नव्हता. अशा स्थितीत मेंदूला रक्त पुरवठा होत नाही. जर अधिक वेळ तसचं राहीलं तर ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत त्यांची तपासणी केली. ब्रेनला काही मार लागला आहे का यासाठी स्कॅन करण्यात आलं. शरिरात अन्य भागात कुठे मार लागला आहे का ते ही तपासले. त्यानंतर त्यांची एन्जोग्राफी करण्यात आली. त्यात अनेक ब्लॉक असल्याचे दिसून आले. तातडीने ते ब्लॉक काढण्यात आले. तेव्हा कुठे त्यांचे ह्रदय सुरू झाले. पण त्यावेळी ते बेशुद्धच होते.
त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. जवळपास चोवीस तास त्यांना शुद्ध नव्हती. ते व्हेंटीलेटरवरच होते. त्यानंतर त्या शुद्ध आली. आशा प्रकरणात येवढ्या लवकर रिकव्हरी होणं हा चमत्कारच समजला पाहीजे असं डॉक्टर डिसूजा म्हणाले. मात्र अनिकेत यांच्या लिव्हर आणि किडणीला मार लागला आहे. अन्य कुठेही त्यांना मार लागलेला नाही. डॉ. विजय डिसूजा यांनी आतापर्यंत 50 हजारांहून अधिक हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या मते ही घटना वैद्यकीयदृष्ट्या चमत्कारक आहे.दरम्यान, छातीत वेदना झाल्यास स्वतः वाहन चालवू नये, असा सल्ला त्यांनी या निमित्ताने दिला आहे.