Trending News: माकडाच्या पिल्लाच्या डोक्यात अडकला तांब्या, त्यानंतर सुरू झाला एक थरार अन् शेवटी...

गिरी यांच्यावर माकडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न ही केला पण त्यांनी तो यशस्वी पणे परतवून लावला.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

एक मन हेलावून टाकणारी, पण तितकीच थरारक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील लोणगाव डोणगाव येथून समोर आली आहे. येथे एका माकडाच्या लहान पिल्लाच्या डोक्यात पाण्याचा तांब्या अडकल्याची घटना घडली. पाण्याच्या शोधात असताना किंवा खेळता खेळता या निष्पाप जीवाच्या डोक्यात हा तांब्या फसला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. डोक्यात तांब्या अडकल्यामुळे या पिल्लाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. याचा व्हिडीओ ही आता व्हायरल झाला आहे.  

तांब्यात डोकं अडकल्यामुळे त्या माकडाच्या पिल्लाला नीट श्वास घेता येत नव्हता. शिवाय समोरचे ही काही दिसत नव्हते. अन्न-पाण्याविना तडफडणाऱ्या या पिल्लाचा जीव पुरता धोक्यात आला होता. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर इतर माकडं हल्ला करत होते. त्यामुळे सर्वच परिस्थिती गंभीर झाली होती. या गंभीर परिस्थितीची माहिती एका प्रणीमित्राला देण्यात आली. समाधान गिरी असं त्याचं नाव होतं. 

Advertisement

नक्की वाचा - Nitesh Rane: 'तुमच्या वडीलांनी मटणाच्या दुकानापासूनच सुरूवात केली' नितेश राणेंना भाजप नेत्यानेच डिवचले

समाधान यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. माकडाची टोळी आणि त्यातही आपल्या पिल्लाच्या जीवावर बेतल्यामुळे आक्रमक झालेल्या इतर माकडांच्या गराड्यातून त्या पिल्लाला सुरक्षितपणे ताब्यात घेणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, समाधान गिरी यांनी अत्यंत संयमाने त्या पिल्लाला जवळ केले. हा थरार तिथे उपस्थित असलेले लोक पाहत होते. गिरी यांच्यावर माकडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न ही केला पण त्यांनी तो यशस्वी पणे परतवून लावला.

नक्की वाचा - NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकर याने सुरू केली होती 'स्पेशल बॅच', खास विद्यार्थ्यांचा होता समावेश, आता CBI..

त्यानंतर घाबरलेल्या माकडाच्या पिल्लाला शांत करत समाधान गिरी यांनी त्याच्या डोक्यातील तांब्या काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अत्यंत हुशारीने आणि कौशल्याचा वापर करत त्यांनी पिल्लाच्या डोक्यात अडकलेला तो तांब्या सुखरूपपणे बाहेर काढला. तांब्या निघताच त्या चिमुरड्या जिवाने मोकळा श्वास घेतला. समाधान गिरी यांच्या या धाडसी आणि संवेदनशील कार्याचे परिसरात कौतुक होत आहे. हा बचाव करताना त्याचा एक व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे. यातून माणूसकीचे दर्शन घडले. 

Advertisement