जाहिरात

NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकर याने सुरू केली होती 'स्पेशल बॅच', खास विद्यार्थ्यांचा होता समावेश, आता CBI..

ज्या पद्धतीने या केसचा तपास करत आहे ते पाहात शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकर याने सुरू केली होती 'स्पेशल बॅच', खास विद्यार्थ्यांचा होता समावेश, आता CBI..
  • NEET पेपर फुटी प्रकरणी सीबीआय लातूरमधील आरसीसी क्लासेसच्या मालक शिवराज मोटेगावकर यांच्याभोवती तपास करत आहे
  • शिवराज मोटेगावकर यांनी स्पेशल बॅच सुरू केली होती ज्यात डॉक्टर आणि नामांकित व्यक्तींच्या मुलांचा समावेश होता
  • सीबीआयने अकोला आणि लातूरमध्ये स्पेशल बॅचमधील विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका आणि नोट्स यांची चौकशी केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

NEET पेपर फुटी प्रकरणी तपास आता आणखी वेगाने होत आहे. या प्रकरणात लातूरमधील सुप्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) क्लासेसचे मालक शिवराज मोटेगावकर यांच्या भोवतीचा फास आवळत चालला आहे. त्यामुळे त्यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. या पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकर यांनी महत्वाची भूमीका साकारली असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सखोल पद्धतीने तपासणी केली जात आहे. त्यातूनच याच शिवराज मोटेगावकरने एक स्पेशल बॅच सुरू केली होती हे तपासात उघड झाले आहे. 

शिवराज मोटेगावकर यांचे क्लासेस हे महाराष्ट्रात फेमस आहे. मात्र त्याने या क्लासेस शिवाय एक "स्पेशल बॅच" सुरू केली होती. ही संपूर्ण बॅच आता CBI च्या रडारवर आहे. शिवराज मोटेगावकर यांने काही खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केली होती. NEET ची ही "स्पेशल बॅच" स्पेशल लोकांच्या मुलांसाठी होती. यात डॉक्टर, नामांकीत व्यक्ती यांच्या मुलांसा समावेश असल्याचं ही आता समोर आला आहे. या विद्यार्थ्यांची थेट जबाबदारीच मोटेगावकर याने घेतली होती. 

नक्की वाचा - Nitesh Rane: 'तुमच्या वडीलांनी मटणाच्या दुकानापासूनच सुरूवात केली' नितेश राणेंना भाजप नेत्यानेच डिवचले

या स्पेशल बॅचमध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची CBI कडून कसून चौकशी करत आहे. काल CBI च्या पथकाकडून अकोला आणि लातूरमध्ये या बॅच मधल्या काही विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांकडे असणारे आणि सोडवलेली प्रश्नपत्रिका, त्याच्याकडील हस्तलिखित नोट्सही पथकाने तपासल्या आहेत. त्यातून काही धागेदोरे मिळतात का असा प्रयत्न सीबीआयच्या पथकाचा आहे. सीबीआय ज्या पद्धतीने या केसचा तपास करत आहे ते पाहात शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा - Pune News: जावयाकडून सासू-सासऱ्यावर काळी जादू, स्मशानात केलं अघोरी कृत्य, Video होतोय व्हायरल

'आरसीसी' (RCC) क्लासेसचे मालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर तपासाची व्याप्ती वाढली आहे. मनिषा मांढरे, मनिषा वाघमारे आणि  पुण्यातील प्राचार्य मनिषा हवालदार यांची नावेही समोर आली आहेत. त्यांची ही चौकशी केली जात आहे.  मनिषा हवालदार या नीटच्या भौतिकशास्त्र (Physics) विषयाच्या भाषांतर प्रक्रियेशी अधिकृतपणे जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्यावर असा आरोप आहे की, स्मृतीवर आधारित प्रश्न तयार करून ते व्हॉट्सॲप आणि प्रिंटआउट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com