Lonavala News: लोणावळ्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर! 'त्या' पर्यटनस्थळावर लोकांची होतेय तुफान गर्दी, Video

मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने कहर केला आहे. नद्या नाल्यांना पूर आला असून धबधबे ओसंडून वाहत आहेत. लोणावळा-खंडाळा परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Lonavala Bhushi Dam Overflow Video

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Lonavala Bhushi Dam Video : मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने कहर केला आहे. नद्या नाल्यांना पूर आला असून धबधबे ओसंडून वाहत आहेत. लोणावळा-खंडाळा परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. लोणावळा–खंडाळ्यातील प्रसिद्ध भूशी धरणही तुडुंब भरलं आहे.धरण ओव्हर फ्लो झालं असून पाणी कठड्यावरून बाहेर वाहत आहे.धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वर्षाविहारासाठी लोणावळ्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

धरण परिसरात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता

राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून पश्चिम महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची नोंद होत आहे.विशेषतः लोणावळा,खंडाळा,भुशी धरण परिसर आणि आसपासच्या भागात संततधार पाऊस सुरू असल्याने निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.दरवर्षीप्रमाणे भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत.मात्र,पावसाचा जोर कायम असल्याने धरण परिसरात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'तुकाराम मुंढे'पॅटर्न! अन्न-औषध प्रशासनाची धडक कारवाई, सात हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

पाण्यात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान,हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात तसेच लोणावळा–खंडाळा भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.त्यामुळे पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज असून प्रशासनाने आवश्यक खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

नक्की वाचा >> Dhule News: धु्ळ्यातही 'ऑपरेशन टायगर', ठाकरे गटाला धक्का, महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश