FDA Action In Pune : अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड,सेफ ड्रग,सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत पुणे विभागात 1 ते 3 जुलै दरम्यान 70 हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली.तपासणीत अस्वच्छता,अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले महत्त्वाचे निर्देश
निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड,क्राऊन बेकर्स सिंहगड रोड,मे.ॲग्रोटीस केटरिंग प्रा.लि.ता.आंबेगाव,जि.पुणे,बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे,रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल 360 बावधन,पुणे यांचा समावेश आहे.अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Rain: मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, घराबाहेर जाणाऱ्यांनी या तारखांना राहा अलर्ट
'...तर नागरिकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा'
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता,अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा,असेही प्रशासनाने म्हटले आहे.
नक्की वाचा >> Nashik News: नाशिककरांनो, आताच सावध व्हा, 'या' भागात फिरतायत एक नव्हे दोन बिबटे, थक्क करणारा व्हिडीओ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world