Yavalmal Rain Update News : बाबुळगाव तालुक्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे एकूण 20 दरवाजे प्रत्येकी 150 सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून 2500 घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी अथवा वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
'नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाणे टाळावे'
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात जाणे टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाचे दरवाजे उघडल्याने वाटखेड (बु.) विरखेड, वाटखेड खुर्द नांदे सावंगी,मुरादाबाद,पालोती,मांगसावंगी हस्तापूर परिसरातील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचले आहे.
नक्की वाचा >>Rain News: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण
शेतकरी आपल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शेतांकडे धाव घेत आहेत.या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून पिके खरडून गेली आहे.हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.