Mumbai Porsche Car Accident: मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गुरुवारी पहाटे पोर्शे कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या पोर्शे कारने नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडक (Hit Divider) दिली, ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
मध्यरात्री सुमारे 2.30 वाजता गुंदवली मेट्रो स्टेशनजवळ ही अपघाताची घटना घडली. अपघातात समाविष्ट असलेल्या तिन्ही कार वांद्रेच्य दिशेने जात होत्या. कार रेसिंगमुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली होती. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये कोणत्याही रेसिंगचा समावेस नव्हता.
(नक्की वाचा- फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला जमिनीवर बसवले; भिवंडीतील शाळेतील संतापजनक प्रकार)
पोर्शे कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कारने दुभाजकाला धडक दिली, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अपघातानंतर पोर्शे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात कारचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगामुळे झालेल्या या अपघाताची पोलिस अधिक तपास करत आहेत.