हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं

दोघांचे लहान पणापासून एकमेकांवर प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते. पण विद्याच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे या दोघांनी पळून जावून लग्न केले.

Advertisement
Read Time: 3 mins
छत्रपती संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगर इथं एक सर्वांनाचा हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण  सर्वत्र मिरवतो, पण यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारीही ही घटना आहे. छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये ऑनर किलींगची घटना घडली आहे.  अमित साळुंखे आणि विद्या कीर्तीशाही हे दोघेही इंदिरानगरमध्ये राहातात. विद्याही बौद्ध समाजाची तर अमित हा गोंधळी समाजाचा. दोघांचे लहान पणापासून एकमेकांवर प्रेम होते. त्यांना लग्न करायचे होते. पण विद्याच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे या दोघांनी पळून जावून लग्न केले. घरापासून लांबही राहीले. पण जेव्हा ते घरी इंदिरानगरमध्ये परतले त्याच वेळी विद्याच्या बापाने आणि भावाने घात केला. काळोखाचा गैरफायदा घेत अमितला भोकसले. त्याच्यावर आठ वार केले. त्यानंतर अमितला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण दहा दिवसाच्या उपचारानंतर त्याची लढाई संपली. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दोन महिन्यापुर्वी विद्या आणि अमितने पुण्याला जावून लग्न केलं. त्यांचे हे लग्न विद्याच्या घरच्यांना मान्य नव्हते. विद्या ही बौद्ध समाजाची होती. तर अमित हा गोंधळी समाजाचा होता. त्यामुळे अंतरजातीय विवाहाला विद्याच्या घरून विरोध होता. त्यामुळेच या दोघांनी पळून जावून लग्न केले. ते घरापासून लांब पुण्यात राहात होते. त्यावेळी या दोघांना सतत धमक्या येत होत्या. एक महिन्यानंतर अमितच्या घरच्यांनी या दोघांनाही घरी बोलवून घेतले. विधीवत त्यांचे पुन्हा लग्न केले. सर्व काही ठिक सुरू होतं. पण विद्याच्या घरातल्यांच्या मनातला राग काही कमी झाला नव्हता. ते अमितवर राग धरून होते. ते संधीच्या शोधात होते. ती संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी घात केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शिळफाटा : पुजाऱ्यांनी बलात्कार अन् हत्या केलेल्या महिलेला न्याय मिळणार!  मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना 

संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अमित घराच्याबाजूलाच असलेल्या झाडा जवळ गेला होता. त्याच वेळी विद्याचा बाप गीताराम कीर्तीशाही आणि भाऊ आप्पासाहेब कीर्तीशाही तिथेच होते. त्या भागातली लाईट अचानक घालवली गेली. याचा फायदा घेत  हे दोघेही बाप लेक अमितवर तुटून पडले. चाकूने एकूण आठ वार त्यांनी अमितवर केले. अमित जोरजोरात ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून घरातले बाहेर आले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या आतड्या बाहेर आल्या होत्या. त्याला त्याच स्थितीत रूग्णालयात हलवण्यात आलं. विद्याचा बाप आणि भाऊ फरार झाले. अमितवर रूग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याला डॉक्टर वाचवू शकले नाहीत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - NITI Aayog Meeting : कोकणाचे पाणी वापरून मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपवण्याबाबत चर्चा

दोन महिन्यापूर्वीच या दोघांनी लग्न केले होते. ज्यावर प्रेम केले त्याच्या बरोबरच लग्न केले याचा आनंद या दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. पुढच्या आयुष्याची स्वप्न ते पाहात होते. पण त्यांच्या या संसाराला कोणाची तरी नजर लागली होती. बौद्ध समाजातील मुलीने गोंधळी समाजातील मुलाशी प्रेमविवाह केला. हा विवाह मुलीच्या घरच्यांना त्यांची प्रतिष्ठा धुळीत मिळवणारा वाटला. त्यामुळे मुलीच्या बापाने-भावाने मुलाचा खून केला. ही खरोखरच हादरवून टाकणारे आहेत. ज्या मोठ्या मंडळींनी आशिर्वाद द्यायचे असतात त्यांचेच हात खून करण्यासाठी उठले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपचे जेष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी, महाराष्ट्राचे राज्यपालही बदलले

पोटचा गोळा यामध्ये गेला. अमितच्या आईचे अश्रू थांबायला तयार नाहीत. माझ्या मुलाचे काय चुकले? त्याने तर प्रेम केले होते त्यात त्याचा दोष काय असा प्रश्न त्या करत आहेत. शिवाय दोषींना फाशीच्यी शिक्षा झाली पाहीजे असंही त्या म्हणाल्या. तर आम्हाला सतत धमक्या येत होत्या. जर इकडे तिकडे दिसाल तर सैराट सारखे तुम्हाला मारून टाकू अशी धमकी विद्याच्या घरच्यानी दिली होती. त्यामुळे गावापासून लांब पुण्यात काही उलट सुलट झालं तर काय करायचं म्हणून पुन्हा गावात परतलो असं विद्या सांगते. पण त्यामुळे आमचा घात झाला असंही ती सांगते.