Aadhaar Card या पद्धतीनं घरीच करा मोफत अपडेट, उशीर केलात तर होईल खर्च !

Aadhaar Card Free Update Deadline: कोणत्याही कामासाठी आधारकार्ड या कागदपत्राची हमखास गरज लागते. तुमचे आधारकार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर तातडीनं अपडेट करा.

Advertisement
Read Time: 3 mins
U
मुंबई:

Aadhaar Card Free Update Deadline: कोणत्याही कामासाठी आधार कार्ड या कागदपत्राची हमखास गरद लागते. तुम्हाला बँक अकाऊंट काढायचं असेल, मोबाईल सिम खरेदी करायचं असेल किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड फक्त तुमचे ओळखपत्र म्हणून काम करत नाही तर तुमचा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवण्याचं काम करते. 

अनेकांना पत्ता बदलल्यानंतर आधार कार्ड अपडेट करावे लागते. तर काही जणांना आधारमधील नाव, जन्मतारीख आणि फोटो चुकीचे असतात. त्यासाठी देखील आधार कार्ड अपडेट  (Aadhaar Card Update) करणे आवश्यक असते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

... तर लगेच अपडेट करा आधार कार्ड

तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर तातडीनं अपडेट करा. सरकारकडूनही याबाबत सातत्यानं आवाहन करण्यात येत आहे. तुम्ही अजून आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर ते 14 सप्टेंबरपर्यंत अपडेट (Aadhaar Card Update Online) करा. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सेवा 14 सप्टेंबरपर्यंत UIDAI पोर्टलवर उपलब्ध आहे. 

आधार कार्ड अपडेट करण्याची सोपी पद्धत पाहूया  (Step to Update Aadhaar Card Online for Free) 

  • सर्वात प्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जा.
  • या वेबसाईटवर तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा पोर्टलवर देण्यात आलेली भाषा निवडा.
  • तुम्हाला जी माहिती अपडेट करायती आहे त्यावर क्लिक करा. उदा - तुम्हाला पत्ता अपडेट करायचा असेल तर तो पर्याय निवडा.
  • पुढील स्क्रीनवर तुम्हाला माय आधारवर लॉग-इन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी OTP पाठवण्यात येईल. त्या आधारावर लॉगइन करता येईल.
  • आता एक नवीन विंडो ओपन होईल. त्यावर तुम्हाला कागदपत्र अपडेट करण्याचा पर्याय दिसेल.
  • कागदपत्र अपडेट करण्याच्या पर्यायावर जा. त्या ठिकाणी योग्य ती सर्व माहिती भरा.
  • सर्व माहितीची पडताळणी करण्यासाठी तुमचे ओळखपत्र आणि पत्ता संबंधातील कागदपत्र अपलोड करा.
  • हे सर्व कागदपत्र फक्त PDF,JPEG आणि PNG फॉर्मेटमध्ये हवे. तसंच त्याची साईज 2 MB पेक्षा कमी हवी.
  • तुम्ही पुरावा म्हणून पॅन कार्ड, व्होटर कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसनसह यादीमध्ये देण्यात आलेले कोणतेही कागदपत्र अपलोड करु शकता. 
  • त्यामधील सर्व पुरावे आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक 14 अंकांचा अपडेट रिक्वेस्ट नंबर पाठवण्यात येईल. त्या नंबरच्या मदतीनं तुम्ही आधार अपडेट रिक्वेस्ट ट्रॅक करु शकता.
  • आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुम्हाला UIDAI कडून मेसेज येईल.
  • आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुम्ही ते UIDAI च्या साईटवरुन डाऊनलोड करु शकता.

ऑफलाईन अपडेटसाठी मोजावे लागतात पैसे

तुम्ही जवळच्या आधार सेंटरवरुन ऑफलाईन पद्धतीनं आधार कार्ड अपडेट करु शकता. त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.  

( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
 

14 सप्टेंबरनंतर काय होणार?

तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत UIDAI च्या वेबसाईटवरुन आधार कार्ड मोफत  अपडेट करु शकता. तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर वेळ वाया घालवू नका. 14 सप्टेंबरनंतर तुम्हाला या कामासाठी 50 रुपये मोजावे लागतील.

Advertisement

( Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

14 सप्टेंबरनंतर जुने कार्ड बाद होणार?

सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे 14 सप्टेंबपरपर्यंत 10 वर्ष जुनं आधार कार्ड अपडेट केलं नाही तर ते बाद होणार का? अशी भीती अनेकांना सतावतीय. तुम्ही घाबरु नका. 14 सप्टेंबरनंतर कोणतंही 10 वर्ष जुनं आधार कार्ड बाद होणार नाही हे  UIDAI नं स्पष्ट केलं आहे. ते तुम्हाला पूर्वीसारखंच वापरता येईल. फक्त 14 सप्टेंबरनंतर मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा बंद होईल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागतील.