Video: 'सर्व पुरुष एकसारखे...', रात्री 3 वाजता घडलेल्या प्रसंगाबाबत तरुणीनं सर्वच सांगितलं, " 2 अज्ञातांनी.."

सोशल मीडियावर नेहमीच शहरातील वाईट घटना आणि ट्रॅफिकच्या समस्यांबाबतचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण बंगळुरूमधून एक असा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman Viral Video

Bangalore Woman viral video: सोशल मीडियावर नेहमीच शहरातील वाईट घटना आणि ट्रॅफिकच्या समस्यांबाबतचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण बंगळुरूमधून एक असा व्हिडीओ समोर आला आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेकांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एक तरुणी (इन्फ्लुएन्सर) रात्री 3 वाजता बंगळुरू विमानतळावरून कडुगोडी येथे पोहोचली. तेव्हा तिच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर तरुणीसोबत जे काही घडलं ते या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

एक बाईक रायडर त्या ठिकाणी पोहोचला अन्..

बसवाल्या भाऊंनी त्या महिलेचा साथ तोपर्यंत सोडला नाही, जोपर्यंत त्याला पक्का विश्वास बसत नव्हता. त्यानंतर एक बाईक रायडर त्या ठिकाणी पोहोचला. विशेष म्हणजे 3 किमीचा प्रवास केल्यानंतर तरुणीनं पैशांबाबत विचारलं, तेव्हा त्या व्यक्तीनं असं काही उत्तर दिलं, जे ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल. त्याने म्हटलं,"मॅडम खूप रात्र झाली आहे.तुम्हाला सुरक्षित पोहोचवणं माझी जबाबदारी होती.तुम्हाला जे काही ठीक वाटेल ते तुम्ही द्या", हे ऐकून त्या तरुणीला खूप बरं वाटलं आणि तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिचा आनंद व्यक्त केला.

Advertisement

नक्की वाचा >> Palghar News : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील हॉटेलमध्ये भयंकर घटना, माणुसकीला काळिमा फासल्याने नागरिकांमध्ये संताप

इथे पाहा तरुणीचा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एकाने प्रतिक्रिया देत म्हटलंय की, "कन्नडी लोकांचं मन खूपच चांगलं असतं. काही लोक चोऱ्या-लुटमार करतात. पण या दोन अज्ञात माणसांनी मानवतेचं उत्तम उदाहरण समोर आणलं आहे".ही घटना फक्त एका प्रवासाची नाहीय. तर त्या विश्वासाची आहे, जो आजच्या जमान्यात क्वचितच पाहायला मिळतो. इन्फ्लुएन्सरने स्पष्ट म्हटलंय की, एक महिला म्हणून जो काही आनंद त्यावेळी झाला, तो शब्दात सांगू शकत नाही.