जाहिरात

Palghar News : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील हॉटेलमध्ये भयंकर घटना, माणुसकीला काळिमा फासल्याने नागरिकांमध्ये संताप

पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई–अहमदाबाद महामार्गावर एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

Palghar News : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील हॉटेलमध्ये भयंकर घटना, माणुसकीला काळिमा फासल्याने नागरिकांमध्ये संताप
Palghar Crime News Today
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar Crime News Today : पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वाडा खडकोना येथील जय अंबे हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर किरकोळ वादातून अंगावर पेट्रोल ओतून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ट्रक चालक दानिश खान (३०) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर मनोज सिंग आणि दिनेश सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  पोलीस उपाधीक्षक विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

हॉटेल मॅनेजरसोबत वाद सुरू झाला आणि..

मिळालेल्या माहितीनुसार,ट्रक चालक दानिश खान हॉटेलमध्ये जेवण उरकून निघून गेला. ट्रकची चावी हॉटेलमध्येच विसरल्याचं त्याच्या लक्षात आलं. चावी घेण्यासाठी तो पुन्हा हॉटेलमध्ये परतला, पण त्यानंतर त्याच्यासोबत भयंकर घटना घडली. चावीच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मॅनेजरसोबत वाद सुरू झाला आणि काही क्षणांतच हा वाद भीषण हाणामारीत बदलला. 

नक्की वाचा >> Ashok Kharat: भोंदू खरातने देवदर्शनाच्या नावाखाली केलेला नवा प्रताप उघड! मुंबई, ठाणे, धुळ्यातील 19 जण रडारवर

महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चालक एकटाच असल्याची संधी साधत हॉटेलमधील काही जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाहीत, तर संतापाच्या भरात त्याच्यावर पेट्रोल ओतण्याचाही प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात दानिश खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनोर येथील सह्याद्री खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या थरारक घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात 'या' भागात मोठी दहशत, धुरंधर पाहिल्यावर चाकू हल्ल्यांचा रिअल थरार, 8 तासानंतर गेम पलटला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com